शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यात आठ कोरोनाबाधितांचा मृत्यू; १९४ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 22:25 IST

यवतमाळ जिल्ह्यात आठ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 194 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: गत 24 तासात जिल्ह्यात आठ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 194 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. मृत झालेल्या आठ जणांमध्ये यवतमाळ शहरातील 70 वर्षीय पुरुष व 58 वर्षीय महिला, वणी शहरातील 70 वर्षीय महिला, पुसद येथील 64 वर्षीय पुरुष, महागाव शहरातील 30 वर्षीय पुरुष, बाभुळगाव शहरातील 65 वर्षीय पुरुष, राळेगाव शहरातील 63 वर्षीय पुरुष आणि आणि तालुक्यातील 70 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.तर नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 194 जणांमध्ये 127 पुरुष व 67 महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील 49 पुरुष व 21 महिला, यवतमाळ तालुक्यातील तीन पुरूष व दोन महिला, पांढरकवडा शहरातील 28 पुरुष व 15 महिला, पांढरकवडा तालुक्यातील दोन पुरुष, पुसद शहरातील 18 पुरुष व नऊ महिला, आर्णी शहरातील सात पुरुष व दोन महिला, आर्णी तालुक्यातील एक महिला, दारव्हा शहरातील एक पुरुष, दिग्रस शहरातील दोन पुरुष व पाच महिला, महागाव शहरातील तीन पुरुष व दोन महिला, महागाव तालुक्यातील तीन पुरुष व चार महिला, मारेगाव शहरातील दोन पुरुष, नेर शहरातील तीन पुरुष, उमरखेड शहरातील एक पुरुष व एक महिला, वणी शहरातील चार पुरुष व पाच महिला, वणी तालुक्यातील एका पुरुषाचा समावेश आहे.जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून माहिती प्राप्त न झाल्यामुळे जिल्ह्यात 228 अ‍ॅक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये भरती असणा-यांची संख्या निरंक असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाने म्हटले आहे. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 8470 झाली आहे. यापैकी कालपर्यंत 6966 जण बरे झाले होते. आज बरे होऊन सुट्टी देणा-यांची संख्या जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून प्राप्त झाली नाही, असे वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण मृत्यूची संख्या 262 झाली आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 275 जण भरती आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 74713 नमुने पाठविले असून यापैकी 73690 प्राप्त तर 1023 अप्राप्त आहेत. तसेच 65220 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस