यवतमाळ : शिवसैनिक रामनारायण ऊर्फ दादू मिश्रा याच्या खूनात पत्नीच्या तक्रारीवरून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांमध्ये विठ्ठल ढोणे, जगदीश दांडगे, नाना रोडे तिघेही रा.उमरसरा यांचा समावेश आहे. याशिवाय अज्ञात पाच जाणांचा आरोपींमध्ये समावेश आहे. स्थानिक दाते कॉलेज चौकाकडून उमरसराकडे जात असताना शिवसैनिक दादू मिश्रा याच्यावर धारदार तलवारीने हल्ला करून खून करण्यात आला होता. तीन फोटो चौकात शुक्रवारी ही घटना घडली. दादूची पत्नी सविता हिने वडगाव रोड पोलिसात तक्रार दाखल केली. त्यात घटनेच्या वेळी आठ जण असल्याचे सांगण्यात आले. त्यातील तिघांची नावे नमुद करण्यात आली. त्यावरून भादंवि ३0२, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दादूच्या खूनाच्या घटनेनंतर लगेच संशयितांची नावे पोलिसांना मिळाली होती. मात्र घटनेवरून २४ तास उलटून गेल्यानंतरही एकाही मारेकर्याला हुडकून काढण्यात वडगाव रोड पोलिसांना यश आलेले नाही. (स्थानिक प्रतिनिधी)
शिवसैनिकाच्या खुनात आठ आरोपी
By admin | Updated: May 24, 2014 23:57 IST
शिवसैनिक रामनारायण ऊर्फ दादू मिश्रा याच्या खूनात पत्नीच्या तक्रारीवरून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसैनिकाच्या खुनात आठ आरोपी
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}