शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अर्थव्यवस्था डळमळीत, पण सहजीवनाचा आनंदही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 05:00 IST

कोरोना महामारीच्या संकटामुळे प्रत्येकातच मानवी दृष्टिकोन विकसित होत आहे. पूर्वी विविध समाजाचे सण-उत्सव मिरवणुका व फलकबाजी करून साजरे केले जात होते. यातून त्या-त्या शहरात, गावात जातीमध्ये, समुदायात एक प्रकारची स्पर्धा चालत होती. आता ही स्पर्धा नसून आदरभाव वाढला आहे. प्रत्येकजण आपल्या समुदायापलीकडे जावून मदतीचे वाटप करीत आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनची दुसरी बाजू : जातीय सलोखा जिल्हाभर वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लॉकडाऊनने संपूर्ण समाजजीवन ढवळून निघाले आहे. सार्वजनिक आणि कौटुंबिक सहजीवनावर खोलवर परिणाम झाला आहे. अर्थव्यवस्थेला हादरे जरी जाणवत असले तरी माणसा-माणसातील सलोखा मात्र वाढला आहे. यवतमाळातील गेल्या चार-पाच महिन्यातील लॉकडाऊन काळात याचे पडसाद प्रामुख्याने जाणवले.कोरोना महामारीच्या संकटामुळे प्रत्येकातच मानवी दृष्टिकोन विकसित होत आहे. पूर्वी विविध समाजाचे सण-उत्सव मिरवणुका व फलकबाजी करून साजरे केले जात होते. यातून त्या-त्या शहरात, गावात जातीमध्ये, समुदायात एक प्रकारची स्पर्धा चालत होती. आता ही स्पर्धा नसून आदरभाव वाढला आहे. प्रत्येकजण आपल्या समुदायापलीकडे जावून मदतीचे वाटप करीत आहे. एप्रिल महिन्यात झालेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व रामनवमी एका आठवड्यात आली होती. हे दोन्ही उत्सव यवतमाळ शहरात प्रचंड मिरवणूक काढून व शोभायात्रेने साजरे केले जातात. यावर्षी मात्र हा खर्च टाळून मिरवणुकीची रक्कम गरजू व गरिबांना मदत देण्यावर खर्च करण्यात आली. याचा दुहेरी फायदा झाला. कुठेतरी निर्माण होणारी तेढ, स्पर्धा थांबली व आदरभाव वाढला. हा या लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम म्हटल्यास वावगे ठरणार नाही.आॅनलाईन शिक्षण धोक्याचेइयत्ता दहावी व बारावीतील मुलांना आॅनलाईन शिक्षणाच्या नावाने मोबाईल पुरविल्या जात आहे. यात काही मुले आपल्या अभ्यासक्रमाची लिंक आली नाही, असे सांगून पालकांची दिशाभूल करीत आहे. या मुलांकडूनही काही प्रमाणात आॅनलाईन गुन्हे होण्याची शक्यता वाढली आहे. कॉम्प्युटर व लॅपटॉपच्या डेस्कटॉपवर येणारी लिंक सुरक्षित मानली जाते. यामुळेच आॅनलाईन गुन्ह्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे.कौटुंबिक वादाचे प्रसंग मात्र वाढलेघराबाहेर पडणेच शक्य नसल्याने व पती, वडील पूर्ण वेळ घरात असल्याने अनैतिक संबंधांना आळा बसला आहे. यातून होणारे गुन्हेही कमी झाले आहे. मात्र कामानिमित्त बराच वेळ घराबाहेर राहणारा पती, वडील लॉकडाऊन काळात अधिक काळ घरात घालवित असल्याने वादाचे प्रसंगही वाढले आहे. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात कुटुंबात एकत्र आल्याचा आनंद दिसत होता. नंतर मात्र त्याची जागा कुरबुरीने घेतली. काही प्रमाणात कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यात वाढ झाल्याचे दिसते.