अब्दुल मतीन ।लोकमत न्यूज नेटवर्कपारवा : घाटंजी तालुक्यातील सावरगाव मंगी येथे जलसंधारण विभागामार्फत खोदकाम सुरू आहे. या विभागाने कोणतेही नियोजन न करता व स्थानिक शेतकऱ्यांना सूचना न देता खोदकाम केले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून रबीच्या हंगामातील पिके धोक्यात आली.सावरगाव मंगी येथील रामराव चौधरी, भाऊराव चौधरी, वामन चौधरी, कमल चौधरी या शेतकऱ्यांच्या शेत गट नं. १६३/१ मध्ये जलसंधारण विभागाने मनमानीपणे खोदकाम सुरू केले. त्याची पूर्वसूचना दिली नाही. यामुळे शेताला लावलेले तार कुंपन नष्ट झाले. शिवाय या भागातील शेतकऱ्यांनी सिंचनाकरिता पाईप लाईन टाकली होती. या खोदकामात संपूर्ण पाईप लाईनही फुटली आहे. सुमारे ३५ पाईप उखडले गेले. ऐन हंगामात शेतशिवारात जेसीबी फिरविल्याने सोयाबीन, गहू, हरभरा या पिकांचे मोठे नुकसान झाले.सिंचनाची सोय नसल्याने गहू, हरभरा आता वाळण्याच्या मार्गावर आहे. उपविभागीय अभियंत्यांनी हे काम करताना स्थानिक शेतकºयांना सूचना दिल्या नाही. त्यामुळे नेमके खोदकाम कुठे करायचे हे लक्षात न येता शेताच्या बांधावर, तर काही ठिकाणी मधोमध खोदकाम केले. यामुळे आता जमीन पडिक राहण्याची स्थिती निर्माण झाली. तातडीने कारवाई करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी या शेतकºयांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
जलसंधारणामुळे शेती झाली उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 00:12 IST
घाटंजी तालुक्यातील सावरगाव मंगी येथे जलसंधारण विभागामार्फत खोदकाम सुरू आहे. या विभागाने कोणतेही नियोजन न करता व स्थानिक शेतकऱ्यांना सूचना न देता खोदकाम केले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून रबीच्या हंगामातील पिके धोक्यात आली.
जलसंधारणामुळे शेती झाली उद्ध्वस्त
ठळक मुद्देसावरगाव मंगी : शेतकऱ्यांवर कोसळले संकट