शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

जिल्ह्यात साथरोगाचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 6:00 AM

डेंग्यूसोबतच मलेरियाचा एक रूग्ण सप्टेंबरमध्ये पॉझिटीव्ह सापडला आहे. तर स्क्रब टायफस या आजाराचे दोन पॉझिटीव्ह रूग्ण सापडले आहेत. राळेगाव आणि आर्णी तालुक्यात हे रूग्ण सापडले आहेत. उपचाराअंती या रूग्णांना त्यातून बाहेर काढण्यात आले आहे. खासगी रुग्णालयामध्ये डेंग्यूच्या तपासण्यांसाठी खासगी पॅथॉलॉजींचे नाव सूचविले जाते. त्याऐवजी शासकीय रुग्णालयात या तपासण्या केल्यातर रुग्णांचा खर्च वाचू शकतो.

ठळक मुद्देरूग्णालये हाऊसफुल्ल । डेंग्यूचे १३३, स्क्रब टायफसचे दोन तर मलेरियाचा एक रूग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सततचे ढगाळी वातावरण, अवेळी बरसणारा पाऊस, साचलेले पाणी आणि वस्त्यामध्ये वाढलेले गवत यामुळे जिल्ह्यात साथरोगाने थैमान घातले आहे. यातून डेंग्यू, मलेरिया, स्क्रब टायफसचे रूग्ण आढळले आहे. यात डेंग्यूचे प्रमाण मोठे आहे. व्हायरल इन्फेक्शनमुळे छोट्या मुलांमध्ये आजाराचे प्रमाण वाढले आहे.गत दोन महिन्यापासून जिल्ह्यात साथरोगाने थैमान घातले आहे. ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचे १६० पॉझिटीव्ह रूग्ण आढळले. तर सप्टेंबरमध्ये १३० रूग्ण डेंग्यू पॉझिटीव्ह रुग्ण सापडले. यामुळे आरोग्य विभागाची यंत्रण सजग झाली आहे. सतत ताप येणाऱ्या रूग्णांची डेंग्यू चाचणी प्राधान्याने केली जात आहे. त्यानंतरच उपचार केला जात आहे. यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच सावरता येत आहे. यातून सुुदैवाने कुठलाही रूग्ण दगावला नाही.डेंग्यूसोबतच मलेरियाचा एक रूग्ण सप्टेंबरमध्ये पॉझिटीव्ह सापडला आहे. तर स्क्रब टायफस या आजाराचे दोन पॉझिटीव्ह रूग्ण सापडले आहेत. राळेगाव आणि आर्णी तालुक्यात हे रूग्ण सापडले आहेत. उपचाराअंती या रूग्णांना त्यातून बाहेर काढण्यात आले आहे.खासगी रुग्णालयामध्ये डेंग्यूच्या तपासण्यांसाठी खासगी पॅथॉलॉजींचे नाव सूचविले जाते. त्याऐवजी शासकीय रुग्णालयात या तपासण्या केल्यातर रुग्णांचा खर्च वाचू शकतो. मात्र खासगी रुग्णालयातील शासकीय डॉक्टर तसा उपाय सूचवित नाही. यामुळे रुग्णांच्या उपचारावरील खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या प्रकारापासून रुग्णांनी सावध होण्याची नितांत गरज आहे. तरच साथ नियंत्रणात येणार आहे.फॉगिंंग मशिनच उपलब्ध नाहीजिल्ह्यात साथरोगाला नियंत्रित करण्यासाठी नगरपरिषद आणि ग्रामपंचायतीने खबरदारी म्हणून फॉगिंग मशिन लावणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात नगरपरिषदेकडे या मशिन असल्या तरी त्याचा वापर होत नाही. ग्रामपंचायतीकडे अशा मशिनच उपलब्ध नाही. यामुळे डासांचे प्रमाण घटले नाही. त्यांचा उद्रेक वाढत चालला आहे. यातून सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहे.अवास्तव रक्त चाचण्याप्रथमत: साध्या तापाचा औषधोपचार न करता थेट डेंग्यूच्या संशयाने रक्ताच्या चाचण्या घेण्याकरिता सांगितल्या जात आहे. यामुळे पॅथॉलॉजीचा खर्च वाढला आहे. छोट्यांपासून मोठ्यापर्यंत साऱ्यांनाच या चाचण्या करण्याचे सांगितले जात आहे. यातून रुग्णांच्या नातेवाईकांवर आर्थिक ताण वाढला आहे.जिल्ह्यात डेंग्यूचे पॉझिटीव्ह रूग्ण सापडले आहेत. या रूग्णाचे उपचार नियंत्रणात आहेत. यामुळे आजारामुळे दगावणाऱ्या रूग्णांची संख्या निरंक आहे. संपूर्ण यंत्रणा दक्षतेने काम करीत आहे.- संघर्ष राठोड, जिल्हा हिवताप अधिकारी, यवतमाळ

टॅग्स :dengueडेंग्यूHealthआरोग्य