शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

उपसरपंचाने केला महिला सरपंचाचा विनयभंग; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2022 12:35 IST

पोलिसांनी गुन्हे नोंदविले; ग्रामपंचायत कार्यालयातील वाद

महागाव (यवतमाळ) :सरपंच महिलेचा उपसरपंचानेविनयभंग केला, शिवाय मारहाण केली. तालुक्यातील एका गावात मंगळवारी दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

आरोपी उपसरपंच आहे. उपसरपंच असण्यासोबतच तो ग्रामपंचायत कार्यालयात संगणक ऑपरेटर म्हणूनही काम पाहतो. सरपंच या एका विद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. उपसरपंचा आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत नाहीत, तसेच आपल्याकडे वाईट नजरेने बघतात, अशी सरपंच महिलेची तक्रार आहे. ग्रामसभेची मीटिंग नियोजित करावयाची असल्याने, सरपंच सकाळी कार्यालयात गेल्या. मीटिंग हॉलमध्ये त्या एकट्या असताना आरोपीने त्यांच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यानंतर, फरफटत बाहेर नेले. अश्लील शिवीगाळही केल्याची तक्रार सरपंचाने महागाव पोलिसांत दिली. या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरपंच महिलेच्या पतीविरुद्धही तक्रार

सरपंच महिलेच्या पती विरोधातही महागाव पोलिसांकडे विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. आपली अल्पवयीन भाची ग्रा.प.कार्यालयात बोलावण्यासाठी आली असता, सरपंच महिलेचे पती व इतर चौघांनी तिच्याशी अश्लील चाळे केले, अशी तक्रार उपसरपंचाने दिली आहे. अल्पवयीन मुलीस वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, भादंवि ३५४ व बालकांचे लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रभारी ठाणेदार संजय खंडारे यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगsarpanchसरपंच