शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्हा फणफणला : कोरोनापाठोपाठ आता डेंग्यू, मलेरियाची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 12:27 IST

जिल्ह्यामध्ये डेंग्यूचे १९६ रुग्ण आढळले आहेत. त्यात सर्वाधिक ९० रुग्ण यवतमाळ तालुक्यातील आहे. त्यातच चिकनगुनियाने डोके वर काढल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मात्र, त्यानंतरही नगर परिषद प्रशासनाकडून स्वच्छतेबाबत उपाययोजनेबाबत ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही.

ठळक मुद्दे रुग्णालयात रांगा, डेंग्यूचे १९६ रुग्ण; नगरपालिकांचा स्वच्छतेकडे कानाडोळा

यवतमाळ : नगरपालिकांचे पावसाळ्यातही स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी यवतमाळ शहरासह बहुतांश ठिकाणी डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण वाढले आहेत. त्यातच चिकनगुनियाने डोके वर काढल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मात्र, त्यानंतरही प्रशासन चिडीचूप असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यामध्ये डेंग्यूचे १९६ रुग्ण आढळले आहेत. त्यात सर्वाधिक ९० रुग्ण यवतमाळ तालुक्यातील आहे. त्यातील ३८ रुग्ण यवतमाळ शहरातील आणि मागास वस्त्यांमधील असल्याचे पुढे आले आहे. हा उद्रेक वाढण्यामागे अस्वच्छता कारणीभूत ठरली आहे. नगर परिषद प्रशासनाकडून जिल्ह्यातील विविध भागांमध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे. यवतमाळ शहरातील स्लम एरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही भागांमध्ये हा उद्रेक माेठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.

भारतनगर, चमेडियानगर, अंबिकानगर, तलाव फैल, गवळीपुरा, पंचशील चाैक, पावर हाऊस, धोबीघाट, अशोकनगर, इंदिरानगर, गोदाम फैल, वंजारी फैल, उमरसरा आणि नागरी वस्त्यांमध्ये हा उद्रेक पाहायला मिळतो आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत डेंग्यूचे रुग्ण दिसून येत आहेत.

चिकनगुनियाचे आढळले ६ रुग्ण

काही वर्षांपूर्वी चिकनगुनिया आजाराने जिल्ह्यामध्ये थैमान घातले होते. आता डेंग्यूसोबत चिकनगुनिया आजारही आपले डोके वर काढताना पाहायला मिळत आहे. अस्वच्छतेतून पसरलेला हा आजार डासांच्या उपद्रवाने वाढल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६ रुग्ण आढळले आहेत. यासोबत नेर आणि वटफळीमध्ये मलेरियाचे २ रुग्ण आढळले आहेत. शहराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने अशा प्रकारचा उद्रेक ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. नगर परिषद प्रशासनाकडून स्वच्छतेबाबत ठोस उपाययोजना केली जात नाही.

खासगी रुग्णालयांना दक्षतेचा इशारा

जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्येतील सर्वाधिक उच्चांकी रुग्णसंख्या डेंग्यूमध्ये पाहायला मिळाली आहे. गतवर्षी डेंग्यूचे १२५ रुग्ण होते. यावर्षी हा आकडा १९६ वर पोहोचला आहे. जिल्ह्यातील सर्वच शासकीय आणि खासगी रुग्णालयांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डाॅ. विजय आकोलकर यांनी सांगितले.