शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

बोरीमहलच्या शेतकऱ्याने तयार केले डवरा यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 05:00 IST

इलेक्ट्रानिक्स डवरा यंत्र बनविण्यासाठी १५ हजार रुपये खर्च आला. तीन व दीड फुटापर्यंत या मशीनने डवरा चालविता येतो. पेरणी, फवारणी एवढेच नाही तर खत टाकणेही या यंत्राने करता येते. जे काम बैलजोडीने प्रती एकर एक हजार २०० रुपयात होते, तेच काम तब्बल तीन एकर शेत डवरणे एका माणसाच्या मजुरीसह ५५० रुपयात होते. त्यांचे हे डवरा यंत्र पाहण्याठी अनेक शेतकरी त्यांच्या शेतात भेटी देत आहे.

ठळक मुद्देटाकाऊ वस्तूचा उपयोग, कमी खर्चात जास्त काम, ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये कमालीचे औत्सुक्य

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : तालुक्याच्या बोरीमहल येथील एका युवा शेतकऱ्याने टाकाऊ वस्तूपासून शेतात चालणारे डवरा यंत्र बनविले आहे. या यंत्रामुळे कमी खर्चात जास्त काम करता येते. हेमंत चुनारकर या युवकाने हे यंत्र तयार केले आहे.इलेक्ट्रानिक्स इंजिनियरची पदवी प्राप्त केलेल्या हेमंतने काही दिवस कंपनीत काम केले. आता गावामध्ये शेतीचे काम करीत आहे. शेतीत नवनवीन प्रयोग करुन कमी श्रम आणि खर्चात शेती कशी करता येईल, यावर तो संशोधन करत आहे. याचाच एक भाग म्हणून त्याने हे डवरा यंत्र तयार केले आहे. हे यंत्र बनविण्यासाठी त्याला वडील विठ्ठल चुनारकर यांनी मदत केली. भाजपच्या महिला सरचिटणीस वैष्णवी चिमुरकर यांचे त्याला प्रोत्साहन होते.इलेक्ट्रानिक्स डवरा यंत्र बनविण्यासाठी १५ हजार रुपये खर्च आला. तीन व दीड फुटापर्यंत या मशीनने डवरा चालविता येतो. पेरणी, फवारणी एवढेच नाही तर खत टाकणेही या यंत्राने करता येते. जे काम बैलजोडीने प्रती एकर एक हजार २०० रुपयात होते, तेच काम तब्बल तीन एकर शेत डवरणे एका माणसाच्या मजुरीसह ५५० रुपयात होते. त्यांचे हे डवरा यंत्र पाहण्याठी अनेक शेतकरी त्यांच्या शेतात भेटी देत आहे. शेतीच्या कामासाठी खर्चाचा भार शेतकऱ्यांवर वाढत आहे. अशावेळी हेमंत चुनारकर याने तयार केलेले डवरा यंत्र बचतीसाठी मार्ग देणारा ठरला आहे. शिवाय हेमंतच्या कल्पकतेला बळ मिळाले आहे.यंत्रासाठी केल्या भंगारातून वस्तू खरेदीडवरा यंत्र बनविण्यासाठी ७० टक्के साहित्य भंगारातून खरेदी करण्यात आले. ३० टक्के साहित्य नवीन घेतले. हे यंत्र पूर्णपणे पेट्रोलवर चालणारे आहे. एक एकरासाठी केवळ एक लिटर पेट्रोल खर्ची होते. विशेष म्हणजे एका दिवसात तीन ते चार एकर जमीन सहज डवरली जाऊ शकते. कमी श्रमामध्ये हे काम पूर्ण करता येते.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती