शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
5
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
6
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
7
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
8
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
9
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
10
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
11
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
12
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
13
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
14
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
15
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
16
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
17
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
18
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
19
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
20
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
Daily Top 2Weekly Top 5

दोनदा कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेनंतरही अपत्य

By admin | Updated: June 3, 2016 02:40 IST

छोटे कुटुंब, सुखी कुटुंब हा मंत्र ध्यानी घेऊन एका महिलेने दोन अपत्यानंतर आपली कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करवून घेतली.

मदतीसाठी प्रशासनाकडे धाव : दोन मुलानंतर शस्त्रक्रिया केलेल्या महिलेला दोन मुलीयवतमाळ : छोटे कुटुंब, सुखी कुटुंब हा मंत्र ध्यानी घेऊन एका महिलेने दोन अपत्यानंतर आपली कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करवून घेतली. मात्र या शस्त्रक्रियेनंतरही तिला तीन मुली झाल्या. यानंतर अखेर पतीने शस्त्रक्रिया करून घेतली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे शस्त्रक्रिया केल्यानंतरही आपल्याला अपत्य झाल्याने प्रशासनाने मदत करावी, अशी मागणी आता ही महिला करीत आहे. यवतमाळ तालुक्यातील कामठवाडा येथील सोनीबाई (नाव बदललेले) या महिलेची ही कहाणी आहे. तिचे लग्न झाल्यानंतर एक मुलगा व एक मुलगी असे अपत्य झाले. सुखी संसारासाठी दोन मुलावर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. १९९५ मध्ये त्यांनी आरोग्य विभागाच्यावतीने आयोजित अकोलाबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शिबिरात शस्त्रक्रिया करुन घेतली. मात्र काही दिवसातच ही शस्त्रक्रिया फेल झाल्याचे लक्षात आले. शस्त्रक्रियेनंतरही तिला मुलगी झाली. दरम्यान या प्रकाराची तक्रार सदर महिलेने पतीसह आरोग्य विभागाकडे केली. परंतु कुणीही दखल घेतली नाही. दरम्यानच्या काळात पुन्हा तिला मुलगी झाली. या प्रकाराने धास्तावलेल्या या कुटुंबाने आरोग्य विभागाकडे तक्रार नोंदविली. तसेच तिच्या पतीने कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करुन घेतली. आता या मुलांच्या पालन पोषणाचा भार या गरीब कुटुंबावर येत आहे. दोन मुलांवरच शस्त्रक्रिया केल्यानंतरही डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आणखी दोन मुलांचे पालन पोषण करण्याची वेळ या कुटुंबावर आली आहे. आपल्यावर झालेल्या या अन्यायाची तक्रार तिच्या पतीने जिल्हा परिषदेकडे केली. या प्रकरणात आरोग्य विभागाने चूक मान्य करीत सदर महिलेला नुकसानभरपाई पोटी ३० हजार रुपये देण्याचे मान्य केले आहे. हा प्रस्ताव जिल्हा परिषद आरोग्य समितीपुढे ठेवण्यात आला. यंत्रणेतील दोष मान्य करून ३० हजार नुकसानभरपाईच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे एकाच महिला डॉक्टरने अकोला बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात १९९५ आणि त्यानंतर १९९७ मध्ये सदर महिलेवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केली होती. दोनही वेळेस शस्त्रक्रिया फेल झाल्याने शेवटी पतीनेच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करुन घेतली. आता तीन एकर कोरडवाहू शेती असताना लग्नाला आलेल्या मुलींच्या भवितव्याचा प्रश्न या दाम्पत्याला सतावत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)