शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पुसदमध्ये धोकादायक ‘ड्रेनेज’

By admin | Updated: June 2, 2016 00:19 IST

शहरातील प्रमुख आणि वर्दळीच्या रस्त्यावर असलेली ड्रेनेज सिस्टीम अत्यंत धोकादायक स्थितीत असून या नाल्यांवरील जाळ्या तुटल्याने अपघाताची कायम भीती असते.

वाहनधारक त्रस्त : चौकाचौकांतील नाल्यावरील जाळी तुटलेली अखिलेश अग्रवाल  पुसदशहरातील प्रमुख आणि वर्दळीच्या रस्त्यावर असलेली ड्रेनेज सिस्टीम अत्यंत धोकादायक स्थितीत असून या नाल्यांवरील जाळ्या तुटल्याने अपघाताची कायम भीती असते. ड्रेनेज चुकविताना नागरिक त्रस्त झाले आहे. येथील प्रमुख रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. शिवाजी चौक, सुभाष चौक, गांधी चौक या मुख्य रस्त्यावरून शाळा, महाविद्यालये, बसस्थानक, कापड लाईन, नगरपरिषद येथे नागरिक जातात. त्यामुळे २४ तास येथे वर्दळ दिसते. शिवाजी चौकात मधोमध असलेली आणि काही ठिकाणी अत्यंत खोल गेलेले ड्रेनेज आहे. काही ठिकाणी ड्रेनेजच्या लोखंडी जाळ्या बाहेर आल्या आहे, तर काही ठिकाणी तुटलेल्या आहे. सुभाष चौकात चार ड्रेनेज आहे. त्यापैकी एक-दोन ड्रेनेज नेहमीच नादुरुस्त असतात. त्यामुळे नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. गांधी चौकात दोन ड्रेनेज आहे. येथील ड्रेनेजची अवस्था फारशी चांगली नाही. शिवाजी चौकात मधोमध तीन ड्रेनेज आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून एक ड्रेनेज नादुरुस्त आहे. हा पुसद शहरातील मुख्य चौक आहे. याच मार्गाने मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. पंजाब नॅशनल बँकेसमोरील ड्रेनेजची अशीच अवस्था आहे. शहरातील सांडपाण्याची व्यवस्था करण्यासाठी नाल्यांची निर्मिती करण्यात आली. अनेक चौकातून या नाल्या रस्त्याच्या मधोमध आहेत. नाल्यांची साफसफाई करण्याच्या दृष्टीने रस्त्याच्या अर्ध्या भागावर लोखंडी जाळी टाकली आहे. परंतु यावरून भरधाव वाहने जात असल्याने या जाळ्या तुटतात. त्यामुळे येथे खड्डे निर्माण होतात. तर दुसऱ्या बाजूला सिमेंटचा धाबा टाकल्याने उंचवटे झाले आहे. अशा परिस्थितीत वाहनधारक आपले वाहन जीव मुठीत घेवून चालवितात. अनेक ड्रेनेजच्या झाकणांमुळे वाहन चालविताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. नगरपरिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधीही याकडे लक्ष देत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. शहरातील ड्रेनेजच्या ठिकाणी उंचवटे आणि खोलगट भाग तयार झाला आहे. त्यामुळे वाहनधारक त्रस्त आहे. पाठीचा त्रास असणारे वाहनधारकांच्या त्रासात यामुळे भर पडते, असे अ‍ॅड.चंद्रशेखर शिंदे यांनी सांगितले. या संदर्भात मुख्याधिकारी, नगरपरिषद उपाध्यक्षांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही.