शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
4
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
5
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
6
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
7
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
8
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
9
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
10
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
11
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
12
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
13
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
14
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
15
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
16
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
17
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
18
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
19
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
20
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
Daily Top 2Weekly Top 5

बापरे...! उकणी खाणीत शिरले चार वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2022 05:00 IST

या वाघांचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी आता कामगारांकडून केली जात आहे. उकणी कोळसा खाणीच्या सभोवताल झुडुपी जंगल आहे. या जंगलात वन्यजीवांचा नेहमीच वावर असतो. अस्वल, रोही, रानडुक्कर आदी प्राण्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे शिकारीसाठी या भागात गेल्या अनेक महिन्यांपासून वाघाचा वावर आहे. सकाळी खाणीत कामासाठी जाणाऱ्या कामगारांना अनेकदा व्याघ्रदर्शन झाले आहे. त्यामुळे खाणीतील कामगार जीव मुठीत घेऊन खाणीत कामासाठी जात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : मध्यरात्रीनंतर १ वाजताची वेळ... खाणीतील एक कामगार डम्पर घेऊन पार्किंगकडे निघतो... पार्किंगजवळ पोहोचताच, अचानक एक वाघिण पुढे येते... त्या पाठोपाठ तिचे तीन बछडेही समोर येतात... हे दृश्य पाहताच, डम्पर चालक घाबरून जातो. मात्र, प्रसंगावधान राखून समाेरचे दृश्य आपल्या मोबाइलच्या कॅमेऱ्यात कैद करतो. ज्या ठिकाणी सदैव कामगारांची वर्दळ असते, अशा उकणी खाणीत गुरुवारी रात्री हा थरार घडला. एकाच वेळी चार वाघांचा वावर पाहून कामगारांमध्ये दहशत पसरली आहे. या वाघांचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी आता कामगारांकडून केली जात आहे. उकणी कोळसा खाणीच्या सभोवताल झुडुपी जंगल आहे. या जंगलात वन्यजीवांचा नेहमीच वावर असतो. अस्वल, रोही, रानडुक्कर आदी प्राण्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे शिकारीसाठी या भागात गेल्या अनेक महिन्यांपासून वाघाचा वावर आहे. सकाळी खाणीत कामासाठी जाणाऱ्या कामगारांना अनेकदा व्याघ्रदर्शन झाले आहे. त्यामुळे खाणीतील कामगार जीव मुठीत घेऊन खाणीत कामासाठी जात आहेत. उकणी खाणीत तीन शिफ्टमध्ये काम चालते. आजवर खाण परिसरात वाघाचा वावर होता. आता एक वाघिण थेट आपल्या बछड्यांसह खाणीत भटकत असल्याने  कामगारांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. वणी परिसरात दिवसागणीक वाघांचा संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. वणी तालुक्यातील मोहोर्ली, कोरंबी-मारेगाव, विरकुंड, रासा, बोर्डा, घोन्सा, सुकनेगाव, नेरडपुरड, पेटूर या भागांत अनेक महिन्यांपासून वाघाचा वावर आहे. रासा शेतशिवारात तर दररोजच व्याघ्रदर्शन होत आहे. अद्याप वाघाने मानवावर हल्ले केले नसले, तरी पाळीव जनावरांच्या शिकारीत मोठी वाढ झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. वाघांची संख्या वाढल्याने या तालुक्यात मानव-वाघ संघर्ष चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वणी तालुक्यालगत चंद्रपूर जिल्हा आहे. त्यामुळे ताडोबातील वाघ सहजपणे वणी तालुक्यात प्रवेश करतात. या भागातून वाघांचा भ्रमणमार्गही गेला आहे. त्यामुळे वाघांची सातत्याने ये-जा सुरू असते. सोबतच केळापूर तालुक्यातील अभयारण्यही अगदी जवळ आहे. त्यामुळे तेथील वाघही झरी, तसेच वणी तालुक्यात येत आहेत.

झुडूपांमुळे वन्यजिवांसाठी सुरक्षित वातावरण- उकणी खाणीलगत कोलार पिंपरी कोळसा खाण आहे. मात्र, गेले अनेक दिवसांपासून ही खाण बंद आहे. सोबतच या खाणीभोवती झुडपी जंगल आहे. त्यामुळे वन्यजिवांसाठी हा भाग अतिशय सुरक्षित असल्याने या भागात वाघांचा कायम वावर दिसून येतो.

 

टॅग्स :Tigerवाघ