शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

रूग्णालयाने टाकली कात

By admin | Updated: October 8, 2014 23:34 IST

आदिवासीबहुल या तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयाच्या ढेपाळलेल्या प्रशासनाने केवळ आॅक्सिजनवर सुरू असणाऱ्या रूग्णालयाने कात टाकल्याने आता रूग्णालयास ऊर्जितावस्था आली आहे.

रिक्त पदे कायमच : केवळ ३० खाटांचे रूग्णालय, वास्तूच्या दुरुस्तीची गरजमारेगाव : आदिवासीबहुल या तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयाच्या ढेपाळलेल्या प्रशासनाने केवळ आॅक्सिजनवर सुरू असणाऱ्या रूग्णालयाने कात टाकल्याने आता रूग्णालयास ऊर्जितावस्था आली आहे. आता मोठ्या संख्येने, विश्वासाने रूग्ण येथे दाखल होऊ लागले आहे़तालुक्यासाठी ३० खाटांचे ग्रामीण रूग्णालय शहरात आहे. मात्र रूग्णालयाच्या ढेपाळलेल्या प्रशासनाने रूग्णालयच समस्याग्रस्त बनले होते़ रूग्ण कल्याण समितीचासुध्दा रूग्णालयावर अंकुश नव्हता़ रूग्णालयातील अर्ध्याअधिक खाटा बेपत्ता होत्या़ रूग्णालयात पिण्याचे पाणी नाही, नियमित स्वच्छता नाही़ विजेचे पंखे, कुलर नादुरूस्त होते. रूग्णालयात औषधी उपलब्ध असताना रूग्णांना बाहेरून औषधी आणावी लाग होती. वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने अत्यावश्यक वेळी आरोग्य सेवा मिळत नव्हती़ अशा अनेक समस्यांनी ग्रासलेल्या रूग्णालयात रूग्ण दाखल होण्यापेक्षा खासगी रूग्णालयाकडे धाव घेत होते़ रूग्णालयाच्या ढेपाळलेल्या प्रशासनाबाबत ‘लोकमत’ने सातत्याने वृत्त प्रकाशित करून वरिष्ठांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. अशातच १ जुलै २०१४ रोजी या रूग्णालयात सेवाभावी वृत्तीचे डॉ़ सुभाष इंगळे रूजू झाले़ रूग्णालयाची खस्ता हालत बघून रूग्ण कल्याण समितीच्या सभेत त्यांनी रूग्णालयातील समस्यांचा विस्तृत पाढा आमदार कासावारांसमोर मांडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली़ उपलब्ध सर्व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन रूग्णालयाला ऊर्जितावस्था आणून खऱ्या अर्थाने रूग्णांना रूग्णसेवा देण्याचा जणू त्यांनी संकल्प केला़ दवाखान्याची आंतरबाह्य रंगरंगोटी करून घेतली़ रूग्णालयातील दोनही वॉर्डात बेड लावले, भरपूर औषधी आणली. रूग्णालयातील बंद विद्युत पंखे फिरू लागले. रूग्णांसाठी फिल्टरचे पिण्याचे पाणी उपलब्ध करवून दिले़ दवाखान्याची नियमित स्वच्छता होऊ लागली़ सर्व कर्मचारी कामाला लागले़ एक महिन्यापूर्वी प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ़संदीप वानखेडे येथे रूजू झाले़ तेही सेवाभावी वृत्तीचेच असल्याने आता दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपलब्ध तुटपुंज्या कर्मचाऱ्यांच्या भरवशावर रूग्णसेवा सुरू केल्याने रूग्णालयात रूग्णांची संख्या वाढली़ मागील महिन्यात तर एवढी रूग्णसंख्या वाढली की, रूग्णांना बेड कमी पडू लागले़ आता ग्रामीण रुग्णालयाचा चेहरामोहरा बदलल्याने इतर खासगी रूग्णालयातील रूग्णसुध्दा येथे दाखल होऊ लागल्याने १० वर्षांपूर्वी याच रूग्णालयात सेवा देणारे डॉ़सिंग व डॉ़अरोरा यांची नागरिकांना आठवण होऊ लागली आहे. त्यांनी आपल्या सेवा काळात दिलेली सेवा अविस्मरणीय ठरली होती. आता येथे कार्यरत डॉ़इंगळे आणि डॉ़ वानखेडेकडूनही नागरिकांची तीच अपेक्षा आहे़ (तालुका प्रतिनिधी)