शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवस बंदमुळे उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 05:01 IST

रविवार, २६ एप्रिल रोजी अक्षय तृतियेचा सण आहे. त्याचे मडके, पत्रावळी आदी साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केली होती. चार दिवसांचा बंद लक्षात घेता कित्येकांनी शुक्रवारी सकाळी ७ वाजतापूर्वीपासूनच आपली दुकाने उघडली होती. यवतमाळात गांधी चौक, दत्त चौक, आर्णी नाका, मारवाडी चौक, छोटी गुजरी या भागात खरेदीसाठी गर्दी झाली.

ठळक मुद्देकिराणा दुकानांसमोर रांगा : अक्षय तृतियेसाठी खरेदीदारांची धूम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गुरुवारी एकाच दिवशी कोरोनाचे नऊ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शुक्रवारी दुपारी १२ पासून सोमवारी मध्यरात्री १२ पर्यंत असे चार दिवस सलग शहर कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले. पुढील तीन दिवस काहीच मिळणार नसल्याने शुक्रवारी सकाळपासूनच यवतमाळ शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची तुंबळ गर्दी झाली. दुपारचे १२ वाजत असूनही किराणा दुकानांसमोर लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. पोलिसांच्या भीतीने अखेर दुकानदारांनी शटर डाऊन केल्याने काहींना रिकाम्या हाताने परतावे लागले.रविवार, २६ एप्रिल रोजी अक्षय तृतियेचा सण आहे. त्याचे मडके, पत्रावळी आदी साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केली होती. चार दिवसांचा बंद लक्षात घेता कित्येकांनी शुक्रवारी सकाळी ७ वाजतापूर्वीपासूनच आपली दुकाने उघडली होती. यवतमाळात गांधी चौक, दत्त चौक, आर्णी नाका, मारवाडी चौक, छोटी गुजरी या भागात खरेदीसाठी गर्दी झाली. जीवनावश्यक साहित्याची खरेदी करताना नागरिकांना कोरोना संसर्ग होण्याची भीती, सोशल डिस्टन्सिंग याचाही विसर पडला. चार दिवस बंद असल्याने पोलिसांनीही या गर्दीकडे काहिसे दुर्लक्ष केले. परंतु दुपारी १२ वाजताच पोलिसांनी वाहनातून फिरून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. १२ नंतर शहरातील रस्त्यांवर पुन्हा सामसूम झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पुढील चार दिवस केवळ दवाखाने, मेडिकल सुरू राहणार आहे. दुधाच्या दुकानांना सकाळी व सायंकाळी ६ ते ८ या दोन तासांची सवलत देण्यात आली आहे. शुक्रवारच्या बाजारपेठेतील गर्दीने मात्र सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.काही लॉकडाऊनमुळे किती पत्रावळी विकल्या जातील याचा अंदाज न आल्याने कारागिरांनी मागणीनुसार तत्काळ पत्रावळी तयार करण्याचं काम यवतमाळात हाती घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले.

टॅग्स :Akshaya Tritiyaअक्षय तृतीया