शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

पीक परिस्थिती महसूलच्या लेखी उत्तम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2020 5:00 AM

जूनमध्ये पावसाला प्रारंभ झाला. मध्यंतरी पावसाने ओढ दिली. मधात पीक चांगली होते. पण ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने जोर पकडला. झडी स्वरूपातील पावसाने शेत शिवार उद्ध्वस्त केले. शासनाची यंत्रणा या नुकसानीचे सर्व्हेक्षण करीत आहे. शेतकऱ्यांना आपल्या घरात मूग आणि उडीद आणता आला नाही. सोयाबीनला कोंब फुटल्याने सोयाबीनमध्ये बि उरले नाही. कापूस ओला झाला. मोठ्या प्रमाणात पातीगळ झाली.

ठळक मुद्देनजर पैसेवारी : जिल्हाभरातील शेतकऱ्यांमध्ये संताप, सारेच हैराण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यावर्षी प्रारंभापासून जिल्ह्यातील पीक परिस्थिती चिंताजनक आहे. पीक हातात येण्याच्या काळात पावसाने जोरदार हजेरी लावली. शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. यानंतरही महसूल विभागाने जाहीर केलेली नजर पैसेवारी मात्र उत्तम निघाली. जिल्ह्यातील २०४५ गावांची पीक पैसेवारी ६५ टक्के जाहीर करण्यात आली आहे. यामुळे शेतकरी बुचकळ्यात पडले आहेत.जूनमध्ये पावसाला प्रारंभ झाला. मध्यंतरी पावसाने ओढ दिली. मधात पीक चांगली होते. पण ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने जोर पकडला. झडी स्वरूपातील पावसाने शेत शिवार उद्ध्वस्त केले. शासनाची यंत्रणा या नुकसानीचे सर्व्हेक्षण करीत आहे. शेतकऱ्यांना आपल्या घरात मूग आणि उडीद आणता आला नाही. सोयाबीनला कोंब फुटल्याने सोयाबीनमध्ये बि उरले नाही. कापूस ओला झाला. मोठ्या प्रमाणात पातीगळ झाली. ज्वारी सडत आहे. तिळ सडत आहे. तूर वाळत आहे. अशा चिंताजनक परिस्थितीत महसूल प्रशासनाने पीक पैसेवारी जाहीर केली.सर्वांच्या डोळ्यांसमक्ष पीक उद्ध्वस्त होताना शेतकरी पाहत आहे. मग अशा स्थितीत महसूल विभागाच्या यंत्रणेनेने पीक उत्तम असल्याचा निर्वाळा कसा दिला, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. एकीकडे नैसर्गिक संकटाची मालिका शेतकऱ्यांना त्रासून सोडत असताना प्रशासन मात्र कागदावर रेघोट्या मारून त्यांच्या जखमेवर मीठ चोळत असल्याची टीका जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह जाणकार व्यक्त करीत आहे.अहवाल वस्तुस्थितीला धरून नाहीपिकांच्या स्थितीचे तीन अहवाल सादर होतात. त्यातला पहिला नजर पैसेवारीचा अहवाल आला आहे. यात जिल्ह्याची पीक परिस्थिती ६५ टक्के आहे. ५० टक्क्याच्या वर पैसेवारी येणे म्हणजे पीक स्थिती उत्तम, असा निष्कर्ष काढला जातो. हा अहवाल आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे.अशी आहे पीक पैसेवारीयवतमाळ ६५ टक्के, कळंब ६७, बाभूळगाव ६८, आर्णी ६२, दारव्हा ६४, दिग्रस ६५, नेर ६३, पुदस ६५, उमरखेड ६७, महागाव ६२, केळापूर ६४, घाटंजी ६५, राळेगाव ६६, वणी ६७, मारेगाव ६५ तर झरीची पैसेवारी ६३ टक्के जाहीर करण्यात आली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी