Crime News : सावंगी पेरका येथे युवकाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 22:04 IST2021-05-04T22:03:59+5:302021-05-04T22:04:26+5:30
Crime News: जुन्या वादातून सावंगी पेरका येथे शेतात काम करीत असलेल्या २६ वर्षीय युवकाचा गळा आवळून खून करण्यात आला. सुरुवातीला या प्रकरणात राळेगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

Crime News : सावंगी पेरका येथे युवकाचा खून
यवतमाळ - जुन्या वादातून सावंगी पेरका येथे शेतात काम करीत असलेल्या २६ वर्षीय युवकाचा गळा आवळून खून करण्यात आला. सुरुवातीला या प्रकरणात राळेगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.
रोशन नानाजी शेंद्रे (२६) असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेत नानाजी किसनाजी शेंद्रे यांनी राळेगाव पोलीस ठाण्यात खुशाल मारोतराव ढुमणे (३७) रा. सावंगी पेरका याच्याविरोधात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी ३ मे रोजी खुनाचा गुन्हा दाखल केला.
रोशन हा नेहमीप्रमाणे १ मे रोजी सायंकाळी ४ वाजता शेतशिवारात काम करीत होता. तेथे त्याचा खुशालने गळा आवळून खून केला. तत्पूर्वी खुशालने रोशनसोबत जुन्या कारणावरून वाद घालत झटापट केली. मात्र सुरुवातीला रोशनचा मृत्यू नेमका कशाने झाला, हे उघड नव्हते. शवचिकित्सा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी नानाजी शेंद्रे यांचे बयान नोंदविले. यातून ही खुनाची घटना उघड झाली. पोलिसांनी खुशाल ढुमणे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध घेत आहेत.