बोर्डा शिवारात वाघाच्या हल्ल्यात गाय ठार

By Admin | Updated: January 13, 2016 03:03 IST2016-01-13T03:03:29+5:302016-01-13T03:03:29+5:30

लगतच्या बोर्डा शिवारात सोमवारी दुपारी वाघाने गाईवर हल्ला चढवून तिला ठार केले.

The cow killed the cow in the attack on the Board Shiva | बोर्डा शिवारात वाघाच्या हल्ल्यात गाय ठार

बोर्डा शिवारात वाघाच्या हल्ल्यात गाय ठार

वणी : लगतच्या बोर्डा शिवारात सोमवारी दुपारी वाघाने गाईवर हल्ला चढवून तिला ठार केले.
बोर्डा येथील रामभाऊ सरवर यांच्या मालकीची ती गाय होती. सोमवारी दुपारी बोर्डा शिवारात सरवर यांची गाय चरत होती. गाय पाणी पिण्याकरिता लगतच्या नाल्याजवळ जाताच वाघाने हल्ला चढवून ठार केले. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. मंगळवारी सकाळी वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या गाईची किंमत अंदाजे १५ हजार रूपये होती. वाघाच्या हल्ल्यात गाय ठार झाल्याने सरवर यांना आर्थिक फटका बसला. त्यामुळे प्रशासनाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
गेल्या दोन महिन्यापासून घोन्सा परिसरात वाघाचे जनावरांवर हल्ले वाढतच चालले आहे. परिसरात चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने उपाययोजना करून या वाघाचा बंदोस्त करावा, अशी मागणी होत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: The cow killed the cow in the attack on the Board Shiva