शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
6
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
7
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
8
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
9
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
10
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
11
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
12
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
13
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
14
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
15
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
16
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
17
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
18
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
19
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
20
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
Daily Top 2Weekly Top 5

‘झेडपी’त कोरोनाची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 05:00 IST

जिल्हा परिषदेच्या काही अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्या संपर्कातील काही कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. याशिवाय काही अधिकाऱ्यांच्या वाहनचालकांनाही कोरोनाने घेरले होते. सुदैवाने या सर्वांनी कोरोनावर मात केली आहे. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील जवळपास पाच कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय वास्तूसह जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातही कोरोनाची दहशत निर्माण झाली होती.

ठळक मुद्देनिम्मेच कर्मचारी उपस्थित : अभ्यागतांची गर्दीही ओसरली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे अद्याप जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय वास्तूत कोरोनाची दहशत कायम असल्याचे दिसून येते.जिल्हा परिषदेच्या काही अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्या संपर्कातील काही कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. याशिवाय काही अधिकाऱ्यांच्या वाहनचालकांनाही कोरोनाने घेरले होते. सुदैवाने या सर्वांनी कोरोनावर मात केली आहे. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील जवळपास पाच कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय वास्तूसह जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातही कोरोनाची दहशत निर्माण झाली होती.कोरोनामुळे कर्मचारी संघटनांनी अभ्यागतांना प्रशासकीय वास्तूत प्रवेशबंदी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर काही पदाधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ही समस्या तीव्रतेने जाणवली. परिणामी प्रशासकीय वास्तूच्या प्रवेशद्वारावर थर्मल गनने तपासणी सुरू करण्यात आली. वास्तूत प्रवेश करणाऱ्यांच्या हातावर सॅनिटायझर मारणेही सुरू झाले होते. कोरोनाच्या दहशतीमुळे सर्वच अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकही धास्तावले होते. सध्या निम्म्या कर्मचाऱ्यांवर कामकाज सुरू आहे. दुसरीकडे कोरोनाच्या दहशतीने अभ्यागतांची गर्दीही कमी झाली आहे. त्यामुळे प्रशासकीय वास्तूतील गर्दीला आळा बसला आहे. मात्र पुढील काही महिने सर्वांनीच काळजी घेण्याची गरज आहे.२२ वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही लागणजिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या तब्बल २२ वैद्यकीय अधिकाऱ्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय ६७ आरोग्य कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाली. यापैकी बहुतांश जणांनी कोरोनावर मात केली आहे. तथापि डीएचओ ऑफिसमध्ये अद्यापही कोरोनाची दहशत कायम आहे. संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजनांवर जोर दिला जात आहे. या कार्यालयात प्रत्येक अभ्यागताचे नाव आणि मोबाईल क्रमांकही नोंदवून घेतला जात आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या