शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
4
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
5
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
6
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
7
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
8
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
9
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
10
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या धावपळीत शाळांनी केला 6852 ‘डुप्लिकेट’ विद्यार्थ्यांचा भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2021 05:00 IST

पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचे पद संबंधित शाळेत मान्य करून घेण्यासाठी तेथे विद्यार्थ्यांची विशिष्ट संख्या आवश्यक आहे. त्या आधारेच संचालनालयाकडून शाळांची संचमान्यता केली जाते. परंतु, कोरोनाच्या धावपळीत जिल्ह्यातील शाळांनी तब्बल ६,८५२ बोगस नावे ‘स्टुडंट पोर्टल’मध्ये चढवली. 

अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेले वर्षभर संपूर्ण शिक्षण क्षेत्र कोरोना संकटाशी दोन हात करत असतानाच अनेक शाळांनी  शिक्षकांच्या नोकऱ्या टिकविण्यासाठी आपल्या शाळेत शेकडो ‘डुप्लिकेट’ विद्यार्थ्यांची नावे रेकाॅर्डवर चढवली. मात्र, आता शिक्षण संचालकांनी या रेकाॅर्डची पडताळणी केल्यानंतर शाळांची बोगसगिरी चव्हाट्यावर आली आहे. पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचे पद संबंधित शाळेत मान्य करून घेण्यासाठी तेथे विद्यार्थ्यांची विशिष्ट संख्या आवश्यक आहे. त्या आधारेच संचालनालयाकडून शाळांची संचमान्यता केली जाते. परंतु, कोरोनाच्या धावपळीत जिल्ह्यातील शाळांनी तब्बल ६,८५२ बोगस नावे ‘स्टुडंट पोर्टल’मध्ये चढवली. 

३०० शिक्षक ठरणार अतिरिक्त 

-  साडेसहा हजार विद्यार्थ्यांची ‘डुप्लिकेट’ नावे पोर्टलवर चढविण्यात आली. ही नावे आता कमी करण्याचे आदेश आल्यामुळे जिल्ह्यात जवळपास ३०० शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका आहे. 

पुसद, महागाव, उमरखेड, यवतमाळ तालुक्यांत जास्त बोगस विद्यार्थी- जिल्हा परिषद शाळांपेक्षा शहरी क्षेत्रातील अनुदानित शाळांनी सर्वाधिक बोगस विद्यार्थ्यांची नावे पोर्टलवर चढवली आहेत.  - सर्वाधिक १,७४६ डुप्लिकेट विद्यार्थी पुसद तालुक्यातून दाखविण्यात आले आहेत.  - त्याखालोखाल महागाव, उमरखेड आणि जिल्हा मुख्यालय असलेल्या यवतमाळातही ही बनवाबनवी उघड झाली आहे. 

असा झाला विद्यार्थी घोटाळ्याचा पर्दाफाश

३० सप्टेंबरपर्यंत शाळेतील विद्यार्थी संख्या सरल प्रणालीच्या स्टुडंट पोर्टलवर शाळांनी नोंदविणे आवश्यक होते. ही ऑनलाईन आकडेवारी शिक्षण संचालनालयात तपासली गेल्यानंतर त्यात लाखो विद्यार्थ्यांची नावे डुप्लिकेट आढळली. हजारो विद्यार्थ्यांच्या नावापुढे एकच आधार क्रमांक नोंदविण्यात आल्याचे उघड झाले. एकच विद्यार्थी अनेक वर्गांत किंवा अनेक शाळांमध्ये दाखवला गेला. याबाबत आयुक्तांनी व्हीसी घेऊन  दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा