शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे रुग्ण चारशेच्या पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 05:00 IST

यवतमाळ शहर व जिल्ह््यात कोरोनाचा उद्रेक वाढतो आहे. त्या पार्श्वभूमीवर उपाययोजना व पोलिसांच्या बंदोबस्ताचा आढावा घेण्यासाठी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे शनिवारी सायंकाळी यवतमाळात दाखल झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्याकडून रानडे यांनी विविध मुद्यांवर आढावा घेतला.

ठळक मुद्देअ‍ॅक्टिव्ह १२२ । २० रुग्ण वाढले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. शनिवारीसुद्धा जिल्ह्यात २० जण नव्याने पॉझिटिव्ह आले असून यात १३ पुरुष आणि सात महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांची संख्या आता ४१७ झाली आहे. तर १२२ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझिटिव्ह आलेले दोन जण उपचारानंतर बरे झाले. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.शनिवारी नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या नागरिकांमध्ये यवतमाळ शहरातील तायडेनगर येथील एक पुरुष व एक महिला, लहान वडगाव येथील तीन पुरुष व दोन महिला आणि यवतमाळ येथील आणखी एक महिला यांचा समावेश आहे. दिग्रस शहरातील बालाजीनगर येथील एक पुरुष, बाराभाई मोहल्ला येथील एक महिला, देवनगर येथील एक महिला तसेच दिग्रस येथील सहा पुरुष, पुसद शहरातील गांधी वॉर्ड येथील एक पुरुष, पांढरकवडा शहरातील शास्त्री वॉर्ड येथील एक पुरुष आणि पुसद येथील एका महिलेचा समावेश आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला शनिवारी एकूण ३०६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २० पॉझिटिव्ह, २६८ निगेटिव्ह तर १८ नमुन्यांचे अचूक निदान झाले नाही. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४१७ आहे. यापैकी २८७ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत १४ मृत्यू झाले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने शनिवारी ८० नमुने तपासणीकरिता पाठविले.पोलीस महानिरीक्षक दाखलयवतमाळ शहर व जिल्ह््यात कोरोनाचा उद्रेक वाढतो आहे. त्या पार्श्वभूमीवर उपाययोजना व पोलिसांच्या बंदोबस्ताचा आढावा घेण्यासाठी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे शनिवारी सायंकाळी यवतमाळात दाखल झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्याकडून रानडे यांनी विविध मुद्यांवर आढावा घेतला. जिल्ह्यात गंभीर गुन्ह्यांच्या खटल्यांमध्ये गुन्हे शाबिती व शिक्षेचे प्रमाण गेल्या तीन वर्षात तीन पटीने वाढल्याच्या निमित्ताने रानडे यांनी समाधान व्यक्त केले.परिक्षेत्रातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत यवतमाळ जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असल्याचे मकरंद रानडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या