शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी दूध उत्पादक संस्थांना टाळे

By admin | Updated: September 29, 2014 23:12 IST

दूध उत्पादनात अग्रेसर असलेल्या महागाव तालुक्यासह जिल्ह्यातील सहकारी दूध उत्पादक संस्थांना कायमचे टाळे लागले. त्यामुळे आता ग्रामीण भागातही पाकिटाचे दूध शहरातून आणावे लागत असून

रितेश पुरोहित - महागाव दूध उत्पादनात अग्रेसर असलेल्या महागाव तालुक्यासह जिल्ह्यातील सहकारी दूध उत्पादक संस्थांना कायमचे टाळे लागले. त्यामुळे आता ग्रामीण भागातही पाकिटाचे दूध शहरातून आणावे लागत असून पॅकेजमधून शेतकऱ्यांना अनुदानावर आलेल्या दुधाळ जनावरांचाही उपयोग शून्य होत आहे. परिणामी दुधाची गरज भागविण्यासाठी खासगी डेअरींवर अवलंबून राहावे लागत आहे. यवतमाळ जिल्ह्यात २५ ते ३० वर्षांपूर्वी दुधाची गंगा वाहात होती. जिल्ह्यात ७१२ दूध उत्पादक सहकारी संस्थांची स्थापना करण्यात आली होती. त्यातील ४० संस्था महागाव तालुक्यात होत्या. गावागावातून दूध संकलित होऊन शासकीय योजनेला दिले जात होते. शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय असलेल्या दूध उत्पादनातून मोठे पैसे मिळत होते. मात्र अंतर्गत राजकारण आणि खासगी डेअरींचे चढते भाव यातून सहकारी संस्था डबघाईस आल्या. जिल्ह्यातील ५४ संस्था अवसायनात निघाल्या तर ४४५ संस्था कायमच्या बंद झाल्या आहे. यामुळे यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी आपले दूध खासगी डेअरींना देणे सुरू केले आहे. जिल्ह्याची दुधाची गरज पाच लाख लिटर आणि महागाव तालुक्यातील ३० हजार लिटर दुधाची दररोजची गरज आहे. परंतु एवढे दूध सध्या तालुक्यात निर्माणच होत नाही. त्यामुळे शहरातून येणाऱ्या पाकिटातील दुधावर अवलंबून राहावे लागते. जिल्ह्यात २ लाख १२ हजार हेक्टर जंगल क्षेत्र असून महागाव तालुक्यात ४० हजार हेक्टरवर जंगल आहे. पाणी, चारा आणि इतर सुविधा सर्व उपलब्ध आहे. अशा स्थितीतही दूध उत्पादन वाढताना दिसत नाही. शेकडोंनी असणारी गावागावातील जनावरेही आता कमी होताना दिसत आहे. पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याकडे दुधाळ गाई, म्हशी असायच्या. परंतु चाराटंचाई व इतर कारणांनी जनावरांची संख्या घटत गेली. अनेक शेतकऱ्यांकडे तर नाहीच्या बरोबरीच जनावरे आहेत. त्यामुळे ज्यांच्या घरी दुधाची गंगा वाहात होती त्या शेतकऱ्यांनाही आता पाकिटातून दूध आणावे लागत आहे.