मूलनिवासी महिला संघाचे अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 09:51 PM2019-08-12T21:51:36+5:302019-08-12T21:52:13+5:30

राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ आणि भारतमुक्ती महिला मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळात तालुकास्तरीय अधिवेशन नगरवाचनालयात पार पडले. यावेळी लोकशाहीत घातक ठरलेल्या ईव्हीएम मशिनच्या गैरवापरावर चिंता व्यक्त करण्यात आली.

Convention of Native Women's Association | मूलनिवासी महिला संघाचे अधिवेशन

मूलनिवासी महिला संघाचे अधिवेशन

googlenewsNext
ठळक मुद्दे‘ईव्हीएम’मुळे लोकशाही धोक्यात : पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली चिंता

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ आणि भारतमुक्ती महिला मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळात तालुकास्तरीय अधिवेशन नगरवाचनालयात पार पडले. यावेळी लोकशाहीत घातक ठरलेल्या ईव्हीएम मशिनच्या गैरवापरावर चिंता व्यक्त करण्यात आली.
उद्घाटक जमात-ए-हिंदच्या अध्यक्ष रोशन आरा, तर अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या अध्यक्ष श्वेता बारघाटे होत्या. जमात-ए-हिंदच्या मीडिया प्रमुख शामिना बानू, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या प्रदेशाध्यक्ष कुंदा तोडकर, प्राचार्या अर्चना खंडागळे, डॉ. हेमलता भडके, सारिका भगत, शोभा खडसे, इंदू मोहर्लीकर, मृणाल राऊत, डॉ. संध्या धाडसे, मनिषा तिरणकर, सुनंदा मडावी, सपना कदम, प्रमोदिनी रामटेके, तारा कनाके यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी याप्रसंगी आपले विचार मांडले.
इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनविषयी कमालीची चिंता व्यक्त केली. शासनाने यावर उपाययोजना कराव्या, असे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमास सुनिता तामगाडगे, रत्नमाला पेटकर, भाग्यश्री तिरमारे, सुनिता पोपटकर, जिजा तलवारे, अर्चना परडके, संगीता ओंकार, करूणा भोयर, कुमुद बागडे, कमल कांबळे, चित्र खरे, द्रोपदा भितकर, पूजा खरे, वंदना मून, वीणा नागदिवे, कविता नागदिवे, स्ववर्णा पवार यांनी प्रयत्न केले.
 

Web Title: Convention of Native Women's Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.