शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
2
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
3
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
4
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
5
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
6
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
7
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
8
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
9
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
10
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
11
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
12
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
13
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
14
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
15
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
17
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
18
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
19
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
20
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलच्या ‘क्ष-किरण’ला रिक्तपदांचा कॉन्ट्रास्ट

By admin | Updated: December 1, 2014 23:01 IST

संतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या क्ष-किरण विभागात सर्वच प्रमुख पदे रिक्त आहेत. एकट्या विभाग प्रमुखाच्या भरोशावर येथील कारभार सुरू आहे. सोनोग्राफी आणि सीटी-स्कॅनसाठी रुग्णांना

यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या क्ष-किरण विभागात सर्वच प्रमुख पदे रिक्त आहेत. एकट्या विभाग प्रमुखाच्या भरोशावर येथील कारभार सुरू आहे. सोनोग्राफी आणि सीटी-स्कॅनसाठी रुग्णांना वेटिंगवर राहावे लागत आहे. सोनोग्राफीचा शाश्वत रिपोर्ट येथून मिळेल याची कोणतीच शाश्वती नाही. क्ष-किरण विभागातील रिक्तपदांच्या कॉन्ट्रास्टमुळे आता रुग्णांणाच रिअ‍ॅक्शन येत आहे.
क्ष-किरण विभागांतर्गत एक्स-रे, सोनोग्राफी आणि सीटीस्कॅन सारख्याच्या चाचण्या केल्या जातात. डॉक्टरांची उपचाराची दिशाच येथील रिपोर्टवरून ठरते. त्यामुळे वैद्यकीय उपचारात या चाचण्यांना अनन्य साधारण महत्व आहे. येथील रिक्तपदे भरण्यासाठी कोणीच हालचाली करताना दिसत नाही. पुर्वी येथे एक सहयोगी प्राध्यापक आणि एक अधिव्याख्यात कार्यरत होते. आकृतिबंधानुसार येथे दोन सहयोगी प्राध्यापक आणि दोन अधिव्याख्यात्यांची पदे मंजुर आहेत. मात्र आज या विभागात एकही सहयोगी प्राध्यापक, अधिव्याख्यात नाही. विभागप्रमुखालाच संपूर्ण धुरा सांभाळावी लागत आहे. रिक्तपदामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहेत. रुग्णांचे रिपोर्ट तयार करण्यास वेळ दिल्यानंतर विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होते. अध्यापनावर भर दिल्यास रुग्णांची रांग वाढत जाते. बरचेदा अपघाती रुग्णांचा तातडीने रिपोर्ट द्यावा लागतो, ही कसरत करताना ओढताण होत आहे. ग्रामीण भागातून उपचारासाठी आलेल्या रुग्णांना सातत्याने या विभागात चकरा माराव्या लागतात. रिक्तपदामुळे रुग्णसेवेत अडसर निर्माण झाला आहे. शिवाय ही रिक्तपदे वेळत भरली गेली नाही तर भारती आयुर्विज्ञान परिषदेकडून अभ्यासक्रमाला मान्यता मिळविताना मोठी अडचण निर्माण होणार आहे. यापूर्वीच रिक्तपदामुळे भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने मान्यता नाकारल्याची नामुष्की महाविद्यालयावर ओढवली होती. वेळेत तडजोड केल्यामुळे एमबीबएसच्या जागा कायम राहिल्यात. आता येथे शिकविण्यासाठी शिक्षक नसल्याने काय होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वैद्यकीय महाविद्यालयात क्ष-किरण विभागासोबतच इतर विभागांंना रिक्त पदांचा आजार जडला आहे. मात्र या प्रश्नाकडे कुणी लक्ष द्यायला तयार दिसत नाही. (कार्यालय प्रतिनिधी)