शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

७० कोटींच्या निविदांना कंत्राटदारच मिळेनात !

By admin | Updated: September 5, 2014 00:13 IST

विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन जिल्हाभर मोठ्या प्रमाणात विकास कामांचे भूमिपूजन सुरू आहे. त्यासोबतच निधी उपलब्ध असेल त्या कामाच्या निविदाही काढल्या जात आहे. अशा सुमारे ७० कोटी रुपयांच्या निविदा

बहिष्काराचा परिणाम : आमदारांचे भूमिपूजन ठरतेय फार्सयवतमाळ : विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन जिल्हाभर मोठ्या प्रमाणात विकास कामांचे भूमिपूजन सुरू आहे. त्यासोबतच निधी उपलब्ध असेल त्या कामाच्या निविदाही काढल्या जात आहे. अशा सुमारे ७० कोटी रुपयांच्या निविदा सार्वजनिक बांधकाम खात्याने आॅनलाईन पद्धतीने काढल्या असल्या तरी त्यासाठी कुणीही कंत्राटदार पुढे येण्यास तयार नाही. कारण हॉटमिक्स कंत्राटदारांचा बहिष्कार सुरू असून तो मिटविण्यात जिल्ह्यातील मंत्री, आमदारांना अद्याप तरी यश आलेले नाही. त्यामुळे आमदारांची ही भूमिपूजने सध्या तरी थोतांड ठरू लागली आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्याच्या भीतीने मोठ्या प्रमाणात विकास कामांचे भूमिपूजन केले जात आहे. कित्येक कामांना केवळ प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. अद्याप निधीची तरतूदही नाही. तरीही कामांचे भूमिपूजन करून आमदारांकडून श्रेय लाटण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे. निधीची तरतूद असलेल्या मोठ्या कामांचे भूमिपूजन झाल्यानंतर त्याची निविदा प्रक्रिया प्रारंभ करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या यवतमाळ, पुसद व पांढरकवडा विभागांतर्गत आतापर्यंत सुमारे ७० कोटी रुपयांच्या कामांच्या निविदा काढल्या गेल्या. परंतु या निविदांना अद्यापही कुणीच प्रतिसाद दिलेला नाही. आर्थिक मर्यादेमुळे छोटे कंत्राटदार या कामांसाठी पात्र ठरत नाहीत, तर मोठ्या हॉटमिक्स कंत्राटदारांचा सुमारे महिनाभरापासून बहिष्कार सुरू आहे. सुमारे १०० कोटी रुपयांची थकीत देयके तत्काळ मंजूर व्हावी आणि बांधकाम साहित्याचे दर वाढविण्यात यावे, या मागण्यांसाठी हा बहिष्कार टाकला गेला आहे. त्याबाबत अद्यापही तोडगा निघालेला नाही. पर्यायाने आमदारांनी भूमिपूजन करून आणि निविदा काढूनही प्रत्यक्ष विकास कामे सुरू होऊ शकलेली नाही. कंत्राटदारांचा बहिष्कार कायम राहिल्यास ती अलिकडच्या भविष्यातही सुरू होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे विकास कामांचे भूमिपूजन थोतांड ठरू लागले आहे. सर्वच बांधकाम साहित्याचे बाजारातील दर प्रचंड वाढल्याने कंत्राटदार ४० टक्के दरवाढ मागत आहे. तर बांधकाम खाते अवघे १० ते १५ टक्क्यात बोळवण करण्याच्या तयारीत आहे. एरव्ही कामांसाठी रस्सीखेच आणि कंत्राटदारांच्या उड्या पहायला मिळतात. यावेळी मात्र बहिष्कारामुळे तब्बल ७० कोटींच्या निविदांकडे कुणीही फिरकलेले नाही. डीडी बँकेऐवजी बांधकाम कार्यालयात जमा करण्याची पद्धत आणि बड्या कंत्राटदारांच्या एकजुटीमुळे हे शक्य झाल्याचे सांगितले जाते. (जिल्हा प्रतिनिधी)