शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम गौण खनिज रॉयल्टीची तपासणी

By admin | Updated: January 19, 2017 00:55 IST

गेल्या तीन वर्षात शासनाच्या निधीतून करण्यात आलेल्या विविध सार्वजनिक बांधकामांमधील गौण खनिज रॉयल्टीची तपासणी केली जात आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : तीन वर्षातील लेखाजोखा, विविध विभागांची पथके गठित यवतमाळ : गेल्या तीन वर्षात शासनाच्या निधीतून करण्यात आलेल्या विविध सार्वजनिक बांधकामांमधील गौण खनिज रॉयल्टीची तपासणी केली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून त्यासाठी विविध विभागातील तज्ज्ञांची पथके गठित करण्यात आली आहे. या कारवाईमुळे बांधकाम कंत्राटदारांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. गौण खनिजाचे उत्खनन आणि रॉयल्टीचा प्रचंड घोळ आहे. लिलाव झालेल्या घाटांवरून मोठ्या प्रमाणात आणि कार्यक्षेत्राबाहेर जाऊन गौण खनिजाचा उपसा केला जातो आहे. तर लिलावाच्या प्रतीक्षेत असलेल्या घाटांवरूनही अवैधरीत्या गौण खनिज नेले जात आहे. एवढेच नव्हे तर सार्वजनिक बांधकामांमध्येसुद्धा गौण खनिजाचा कागदोपत्री परवाना दाखवून प्रत्यक्षात अवैधरीत्या गौण खनिज उत्खनन केले जात आहे. हे गंभीर प्रकार पुढे आल्याने राज्य शासनाने गेल्या तीन वर्षातील तमाम सार्वजनिक बांधकामांमध्ये वापरलेल्या गौण खनिज परवाना व रॉयल्टी पावतीची तपासणी करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम, सिंचन, पाणीपुरवठा, नगरपरिषद, पंचायत समिती अशा विविध विभागांची संयुक्त पथके गठित केली आहे. या पथकांना सन २०१३-१४ ते २०१५-१६ या तीन वर्षात शासकीय निधीमधून जिल्हाभर झालेल्या सार्वजनिक बांधकामांमध्ये वापरल्या गेलेल्या रॉयल्टी परवान्याची चौकशी करण्याचे आदेश दिले गेले आहेत. त्यानुसार विविध पथकांमार्फत सर्व १६ ही तालुक्यात चौकशी केली जात आहे. राज्य शासन व जिल्हा परिषदेच्या बांधकाम, सिंचन, पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचा या पथकात समावेश आहे. अनेक बांधकामांना खोट्या रॉयल्टी पावत्या लावल्या गेल्याचे प्रकार पुढे आले आहे. त्यात दारव्हा, दिग्रस, पुसद, उमरखेड, महागाव या भागात अधिक प्रमाणात हा प्रकार असल्याचे सांगितले जाते. सिंचन विभागात आधी रॉयल्टी कापली जाते. मात्र इतर विभागात नंतर रॉयल्टी कापतात. एक कोटींच्या कामावर किमान १५ लाख रुपयांची रॉयल्टी कपात केली जाते. पावत्या जोडल्याचा शेरा चौकशी पथकांना दिलेल्या फॉर्मेटमध्ये सर्वात शेवटी ‘पावत्या जोडल्या’ असा शेरा लिहून काही ठिकाणी वेळ मारुन नेली जात असल्याचे समजते. ही पथकांची कंत्राटदारांसाठी ‘अ‍ॅडजेस्टमेंट’ तर नव्हे ना अशी शंका व्यक्त केली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी) मजूर कामगार सहकारी संस्था बोगस रॉयल्टीत आघाडीवर गौण खनिजांच्या बोगस रॉयल्टी प्रकरणात अनेक मजूर कामगार सहकारी संस्था बऱ्याच आघाडीवर असल्याचे सांगितले जाते. मजूर कामगार सहकारी संस्थांना जिल्हा परिषद व शासनाच्या सिंचन, बांधकाम व अन्य विभागात कामे दिली जातात. मात्र अनेक संस्था आपली कामे दहा टक्के घेऊन लहान कंत्राटदारांना हस्तांतरित करतात. हे कंत्राटदार पुढे रॉयल्टीच्या बनावट पावत्या लावतात. गेल्या काही वर्षांपासून सर्रास हा प्रकार सुरू आहे. प्रत्येक मजूर संस्थेला वर्षभरात किमान एक कोटी रुपयांची कामे मिळतात. दारव्हा येथे काही महिन्यांपूर्वी दोन मजूर संस्थांच्या प्रत्येकी ६० हजारांच्या बोगस रॉयल्टी आढळल्या होत्या. महसूल खात्याने तसा अहवालही दिला. मात्र पुढे ठोस कारवाई होऊ शकली नाही. मजूर कामगार संस्थांनी केलेल्या किमान गेल्या तीन वर्षातील कामांची स्वतंत्र पथकांद्वारे तपासणी केल्यास मोठे घबाड उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.