शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची कार्यकारिणी प्रदेश कार्यालयात पडून

By admin | Updated: September 20, 2014 01:46 IST

जिल्हा काँग्रेस कमिटीची नवी कार्यकारिणी गेल्या

महिनाभरापासून प्रतीक्षा : जिल्हाभरातील कार्यकर्ते अस्वस्थ यवतमाळ : जिल्हा काँग्रेस कमिटीची नवी कार्यकारिणी गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या टिळक भवन मुंबई कार्यालयात पडून आहे. मात्र प्रदेशाध्यक्षांना या कार्यकारिणीला मंजुरी देण्यासाठी सवड मिळालेली नाही. इकडे विधानसभा निवडणुकीचे नामांकन दाखल करण्याचा दिवस उजाडूनही पक्षाची कार्यकारिणीच अस्तित्वात नसल्याने जिल्हाभरातील इच्छुक काँग्रेस कार्यकर्ते अस्वस्थ झालेले पहायला मिळत आहे.१६ जून दरम्यान आमदार वामनराव कासावार यांनी यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी बरखास्त केली. तेव्हापासून नव्या कार्यकारिणीची कार्यकर्त्यांना प्रतीक्षा आहे. कासावार यांनी संपूर्ण जिल्ह्याचा समतोल राखत नवी जम्बो कार्यकारिणी तयार केली. आॅगस्टमध्येच ही कार्यकारिणी मंजुरीसाठी प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांच्या कार्यालयाकडे पाठविण्यात आली. मात्र अद्याप त्याला मंजुरी दिली गेली नाही. असंतुष्टांना एन्ट्री द्यावी की नाही हा सदर कार्यकारिणी रखडण्यामागील मुख्य मुद्दा सांगितला जातो. जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांविरुद्ध बंड पुकारणाऱ्या आणि पक्षाची शिस्त मोडणाऱ्या दुसऱ्या फळीतील अनेक नेत्यांना या कार्यकारिणीतून बाद करण्याचा निर्णय स्थानिक नेत्यांनी घेतला. परंतु या बंडखोरांना पुन्हा कार्यकारिणीमध्ये घ्यावे म्हणून प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांचा आग्रह आहे. याच कारणावरून जिल्ह्यातील काँग्रेस नेते विरुद्ध प्रदेशाध्यक्ष असा वाद पक्षस्तरावर रंगतो आहे. विधानसभा निवडणूक जारी होऊनही काँग्रेसची कार्यकारिणीच अस्तित्वात नसल्याने निवडणुकांना सामोरे जायचे कसे असा प्रश्न जिल्हाध्यक्षांसह नेत्यांना पडला आहे. जिल्ह्यातील सात पैकी सहा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार निवडणूक लढणार आहेत. केवळ पुसदचा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. संपूर्ण जिल्ह्यातच काँग्रेसचे उमेदवार रिंगणात उतरणार असताना पक्षाची कार्यकारिणीच नसल्याने कार्यकर्त्यांची कोंडी झाली आहे. याबाबीला जबाबदार कोण असा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये चर्चिला जात आहे. जिल्ह्यातील नेत्यांनी थेट प्रदेश कार्यालयाकडे बोट दाखविल्याने कार्यकर्त्यांमध्ये माणिकरावांप्रती रोष पहायला मिळत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)काँग्रेसची नवी जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे. ती मंजुरीसाठी गेल्या महिन्यातच प्रदेश काँग्रेस कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहे. या यादीला मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे. ही मंजुरी लवकरच मिळेल अशी आशा आहे. - वामनराव कासावारआमदार तथा जिल्हाध्यक्षकाँग्रेस कमिटी, यवतमाळ.