शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा सभापती, सेनेचा उपसभापती

By admin | Updated: October 29, 2016 00:14 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे रवींद्र रामराव ढोक, तर उपसभापतीपदी शिवसेनेचे गजानन गणपत डोमाळे यांची अविरोध निवड करण्यात आली.

यवतमाळ बाजार समिती : रवींद्र ढोक, गजानन डोमाळेयवतमाळ : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे रवींद्र रामराव ढोक, तर उपसभापतीपदी शिवसेनेचे गजानन गणपत डोमाळे यांची अविरोध निवड करण्यात आली. बाजार समिती कार्यालयात शुक्रवारी ही निवड प्रक्रिया पार पडली. बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या परिवर्तन पॅनलने सर्वच १९ जागांवर विजय मिळविला होता. तत्पूर्वी पणन प्रक्रिया मतदार संघातून या पॅनलचे उमेदवार अविरोध विजयी झाले होते. उर्वरित १८ जागांवरही त्यांचेच उमेदवार विजयी झाले होते. सभापती आणि उपसभापती पदांसाठी बाजार समिती कार्यालयात विशेष सभा घेतली. ढोक व डोमाळे यांनी अर्ज केले. विहित मुदतीत इतर कुणाचेही अर्ज प्राप्त न झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी रिता निनावे यांनी अविरोध निवड झाल्याचे घोषित केले. या विशेष सभेला संचालक राजेंद्र गिरी, सुरेश पात्रीकर, श्रीकांत डंभारे, संजय राठोड, छायाताई शिर्के, ललिताबाई जयस्वाल, सुनील डिवरे, प्रकाश राठोड, किशोर इंगळे, गुणवंत डोळे, रमेश भीसनकर, वसंत भेडेकर, सत्यभामा चव्हाण, किशोर बडे, विजय मुंधडा, राजेंद्र निमोदिया, राजेशकुमार अग्रवाल यांच्यासह बाजार समितीचे सचिव संजय भेंडारकर उपस्थित होते. निवडीनंतर काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नरेश ठाकूर व शिवसेना नेते प्रामुख्याने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)एक तपानंतर झाले परिवर्तनबाजार समितीवर गेली तब्बल १२ वर्षे भाजपाचे सूर्यकांत गाडे यांच्या गटाचे वर्चस्व होते. मात्र त्यांच्या कार्यकाळात बाजार समिती डबघाईस गेल्याचा आरोप करून परिवर्तनने निवडणूक लढविली. यात मतदारांनी त्यांना सहकार्य केल्याने एक तपानंतर बाजार समितीच्या सत्तेत परिवर्तन झाले आहे. नवीन पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणार असल्याचे सांगितले.