पुसदसाठी काँग्रेसच्या मुलाखती

By Admin | Updated: September 1, 2014 23:55 IST2014-09-01T23:55:37+5:302014-09-01T23:55:37+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने रविवारी मुंबईत मुलाखती घेतल्या. त्यात पुसद मतदारसंघासाठी पाच इच्छुकांनी मुलाखतीला हजेरी लावली.

Congress interview for Pusad | पुसदसाठी काँग्रेसच्या मुलाखती

पुसदसाठी काँग्रेसच्या मुलाखती

यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने रविवारी मुंबईत मुलाखती घेतल्या. त्यात पुसद मतदारसंघासाठी पाच इच्छुकांनी मुलाखतीला हजेरी लावली.
पुसद विधानसभा मतदारसंघ मनोहरराव नाईक यांच्या रुपाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत. आघाडी तुटली आणि स्वबळावर निवडणुका लढविण्याची वेळ आल्यास धावपळ होऊ नये म्हणून काँग्रेसनेही राष्ट्रवादीच्या ताब्यातील ११४ मतदारसंघांसाठी मुलाखती घेतल्या. त्यात पुसद विधानसभेसाठीही मुलाखती पार पडल्या. त्यामध्ये या मतदारसंघातून दोन डॉक्टर, दोन नगरसेवक व एका माजी नगरसेवकांनी सहभाग घेतला. पाच पैकी एक इच्छुक अखिल भारतीय युवक काँग्रेसचे पदाधिकारी आहेत.
जिल्ह्यातील सात पैकी सहा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा आहे. त्यासाठीच्या मुलाखती आधीच पार पडल्या. मात्र राष्ट्रवादीने राज्यातील सर्वच २८८ मतदारसंघासाठी मुलाखती घेतल्याचे वृत्त बाहेर आल्याने काँग्रेसनेही उर्वरित सर्वच मतदारसंघात मुलाखती घेतल्या. जिल्ह्यात यावेळी पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या ताब्यातील मतदारसंघांसाठी मुलाखती घेतल्या गेल्या. काँग्रेसच्या ताब्यातील यवतमाळ, उमरखेड व दिग्रसवर राष्ट्रवादीने दावा सांगितला. यवतमाळसाठी राष्ट्रवादीचा सर्वाधिक जोर आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Congress interview for Pusad