शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस जिल्हा कार्यकारिणी रखडली

By admin | Updated: September 6, 2014 02:23 IST

काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील आमदारांविरुद्ध उघड बंड पुकारणाऱ्या दुसऱ्या फळीतील नेत्यांमुळे काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी रखडली आहे.

यवतमाळ : काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील आमदारांविरुद्ध उघड बंड पुकारणाऱ्या दुसऱ्या फळीतील नेत्यांमुळे काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी रखडली आहे. दुसऱ्या फळीतील नेत्यांच्या नावांच्या समावेशाला तीन आमदारांनी तीव्र आक्षेप घेतला असताना प्रदेशाध्यक्ष मात्र या असंतुष्टांना यादीत स्थान देण्यासाठी आग्रही आहेत. विधानसभा निवडणुका तोंडावर आहे. त्याची आचारसंहिता आठवडाभरात जाहीर होणार आहे. परंतु या निवडणुकांना सामोरे जाणाऱ्या काँग्रेसची यवतमाळ जिल्ह्यात कार्यकारिणीच नाही. केवळ जिल्हाध्यक्ष कार्यरत आहेत. त्यांनी अद्यापही आपली टीम जाहीर केलेली नाही. ही टीम जाहीर होण्याची कार्यकर्त्यांना प्रतीक्षा आहे. परंतु या टीममध्ये नेमका कुणाचा समावेश करावा यावरून काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे सांगितले जाते. काँग्रेसमधील नेत्यांची दुसरी फळी या यादीत अडसर ठरली आहे. या फळीने काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील काँग्रेसचे मंत्री, आमदार व नेत्यांविरुद्ध उघड भूमिका घेतली होती. या नेत्यांना व त्यांच्या मुलांना पुन्हा विधानसभेची उमेदवारी देऊ नये अशी पत्रपरिषदेत जाहीर मागणी करताना कासावार यांच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामाही मागितला होता. त्यानंतर कासावारांच्या राजीनाम्याचे नाट्य घडले. नंतर पुन्हा त्यांना त्याच पदावर कायम ठेवण्यात आले. पक्षाच्या आमदारांविरुद्ध उघड भूमिका घेणाऱ्या या दुसऱ्या फळीतील नेत्यांविरुद्ध विद्यमान आमदारांमध्ये प्रचंड रोष पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे या सर्व असंतुष्टांना खुद्द काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी आश्रय दिला आहे. त्यातही मोघे विरोधकांना तर दिग्रसमधून विधानसभेचे तिकीट देण्याची तयारी चालविली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)