शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शंभर कोटींच्या वसुलीसाठी सक्तीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 05:00 IST

दीडशे प्रमुख मोठ्या प्रकरणातील शंभर कोटींची रक्कम ‘एनपीए’  (संभाव्य बुडित) झाली आहे. त्यामुळेच  ‘एनपीए’चा आकडा कमालीचा वाढला होता. सध्या हा ‘एनपीए’ २९ टक्क्यांवर आला असून आणखी कमी करण्याचा बॅंकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी मोठ्या प्रकरणातील रकमा वसुलीचे धोरण ठरविण्यासाठी दोन दिवस संचालक मंडळाची विशेष बैठक पार पडली.

ठळक मुद्देजिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या टाॅप दीडशे प्रकरणात सुमारे शंभर कोटी रुपयांचे कर्ज बुडित आहे. या कर्जाच्या वसुलीसाठी सक्तीने कारवाई करण्याचा निर्णय बुधवारी बॅंकेच्या संचालक मंडळ बैठकीत घेण्यात आला. दीडशे प्रमुख मोठ्या प्रकरणातील शंभर कोटींची रक्कम ‘एनपीए’  (संभाव्य बुडित) झाली आहे. त्यामुळेच  ‘एनपीए’चा आकडा कमालीचा वाढला होता. सध्या हा ‘एनपीए’ २९ टक्क्यांवर आला असून आणखी कमी करण्याचा बॅंकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी मोठ्या प्रकरणातील रकमा वसुलीचे धोरण ठरविण्यासाठी दोन दिवस संचालक मंडळाची विशेष बैठक पार पडली. संचालक राजूदास जाधव या वसुली व विशेष बैठकीसाठी आग्रही असल्याचे सांगण्यात आले. या बैठकीत थकीत कर्जाच्या वसुलीसाठी कालबद्ध कार्यक्रम आणि जबाबदारी निश्चीत करण्यात आली आहे.  सर्वच कर्ज प्रकरणात सक्तीची कारवाई करून धडक वसुली करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. प्रत्येक मोठ्या कर्जदारांशी संपर्क करून वसुलीचे अधिकार अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. बीगर शेती कर्जासाठी बॅंकेकडे तारण असलेल्या स्थावर मालमत्ता ताब्यात घेऊन त्याचा लिलाव करण्याचे ठरले. व्याजात सूट देण्यासाठी सुधारित सामोपचार कर्ज परतफेड योजना तयार करण्यात आली आहे. त्याचा लाभ घेऊन थकीत कर्जदार सभासदांनी कर्जाचा भरणा करावा, असे आवाहन बॅंकेचे अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे यांनी केले. या वसुलीसाठी उपाध्यक्ष वसंत घुईखेडकरसुद्धा आग्रही असल्याचे बॅंकेच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे.

आर्णी शाखेतील गैरव्यवहारात फौजदारी कारवाई  जिल्हा बॅंकेच्या आर्णी शाखेतील गैरव्यवहार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. त्याची दखल घेऊन बुधवारी महिला व्यवस्थापक, रोखपाल व लेखापालाला निलंबित करण्यात आले. तर कंत्राटी लिपिकाची सेवा संपुष्टात आणण्यात आली. संचालक मंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी संचालकांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात चालक व इतर काहींच्या हालचाली संशयास्पद दिसत आहे. पोत्यामध्ये ३० लाखांची रोकड आणल्याच्या संशयाला पुष्टी मिळत आहे. त्यामुळे या चालकासह इतर संबंधितांवर फौजदारी गुन्हे नोंदविण्यात येतील, असे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे यांनी स्पष्ट केले. या बॅंकेच्या एकूणच कारभाराची ‘सीए’ची नेमणूक करून चौकशी केली जाणार आहे. दरम्यान आर्णीच्या या प्रकरणात बुधवारीही एका संचालकाने संशयितांची पाठ राखण करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी जुन्या संचालक मंडळावर खापरही फोडण्यात आले. 

ग्राहकांनी घाबरण्याचे कारण नाही - कोंगरे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, बॅंकेच्या आर्णी शाखेत उघडकीस आलेला प्रकार गंभीर आहे. मात्र त्यात कुणाचीही गय केली जाणार नाही. दोषींना कितीही मोठ्या व्यक्तीचे पाठबळ असले तरी कारवाई होईलच. त्यामुळे ग्राहकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. त्यांच्या रकमा सुरक्षित आहे. ग्राहकांचा विश्वास कायम रहावा म्हणूनच निलंबनासारखी कठोर कारवाई करण्यात आली आहे. दोषींवर फौजदारी गुन्हे नोंदविले जाणार असल्याचेही कोंगरे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :bankबँक