शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

भोजन कंत्राटाच्या निविदा मंजूर करणारी समिती रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 15:13 IST

Yavatmal : आदिवासी विकास मंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पुसद आदिवासी विकास प्रकल्पातील भोजन कंत्राट मिळवण्यासाठी अमरावतीच्या श्री स्वामी समर्थ सर्व्हिसेस या संस्थेने बोगस अनुभव प्रमाणपत्र सादर केल्याचे चौकशीत उघड झाल्यानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. आता कागदपत्रांची पडताळणी न करता निविदा मंजूर करणारी समिती आदिवासी विकास विभागाच्या रडारवर आली आहे.

अमरावती येथील अपर आयुक्त कार्यालयाने निविदा पात्र ठरवून शासनाकडे मान्यतेसाठी पाठवल्यानंतर बोगस अनुभव प्रमाणपत्राचे प्रकरण समोर आले होते. याची चौकशी करण्यासाठी नाशिक येथील आयुक्तांनी अपर आयुक्तांना आदेश दिले होते. मात्र, या प्रकाराची चौकशी करण्यापूर्वीच श्री स्वामी समर्थ सर्व्हिसेसला सात कोटी ३३ लाखांची वित्तीय मान्यता देण्यात आली. बोगस अनुभव प्रमाणपत्राच्या अनुषंगाने चौकशी केल्यानंतर संस्थेने शासनाची फसवणूक केल्याची बाब निष्पन्न झाली. सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करूनच पात्र किंवा अपात्रतेची कार्यवाही समितीने करणे अभिप्रेत असते. तक्रारी होऊनही श्री स्वामी समर्थ संस्थेलाच कंत्राट देण्याचा खटाटोप करण्यात आला. हीच बाब आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी गंभीरतेने घेत संबंधित सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 

संस्थाचालक पसार, पोलिसांकडून शोधश्री स्वामी समर्थ सर्व्हिसेस या संस्थेचा चालक राहुल गवळी गुन्हा दाखल होताच पसार झाला आहे. अमरावतीतील फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याचे ठाणेदार रोशन शिरसाठ यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आरोपीचा शोध सुरू आहे, लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती दिली.

"भोजन कंत्राट निविदेत बोगस अनुभव प्रमाणपत्र सादर केल्याचे प्रकरण गंभीर आहे. संस्था चालकावर गुन्हा नोंदवला असून, कागदपत्रांची पडताळणी न करता निविदा मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. कुणाचीही गय केली जाणार नाही."- प्रा. डॉ. अशोक उईके, आदिवासी विकास मंत्री

टॅग्स :Yavatmalयवतमाळ