शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांनी केली ट्रक चालकांच्या भोजनाची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 05:00 IST

जिल्हाधिकारी एम.डी. सिंह हे आरोग्यबाबत जागरुक आहेत. दिवसभराच्या धावपळीतूनही रात्री काही वेळ स्वत:च्या फिटनेससाठी काढतात. फिटनेससोबत लॉकडाऊनची अंमलबजावणी कशी आहे, हे बघण्यासाठी जिल्हाधिकारी ट्रॅकसूट घालून रात्री घराबाहेर पडले. फिरत असताना दारव्हा नाक्यावर त्यांना दोघे जण ट्रकजवळ उभे दिसले.

ठळक मुद्देसंवेदनशिलतेचा परिचय : रात्री ११.३० वाजता दारव्हा नाक्यावरील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सर्वत्र लॉकडाऊनमुळे वाहन चालकांची जेवणाची आबाळ होत आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी अशाही संकटाच्या काळात ट्रक चालक सेवा देत आहे. शनिवारी रात्री ११.३० वाजता दारव्हा नाक्यावर ट्रक उभा करून चालक व वाहक जेवणासाठी शोधाशोध करीत होते. इतक्यात रपेट मारण्यासाठी निघालेल्या जिल्हाधिकाऱ्यांची नजर त्यांच्यावर पडली. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या सेवेबद्दल सहानुभूतीही दर्शविली.जिल्हाधिकारी एम.डी. सिंह हे आरोग्यबाबत जागरुक आहेत. दिवसभराच्या धावपळीतूनही रात्री काही वेळ स्वत:च्या फिटनेससाठी काढतात. फिटनेससोबत लॉकडाऊनची अंमलबजावणी कशी आहे, हे बघण्यासाठी जिल्हाधिकारी ट्रॅकसूट घालून रात्री घराबाहेर पडले. फिरत असताना दारव्हा नाक्यावर त्यांना दोघे जण ट्रकजवळ उभे दिसले. त्यांनी आपण कोण, का उभे आहात, अशी विचारणा केली. त्यावेळी या ट्रक चालक व वाहकाने जेवणाची अडचण असल्याचे सांगितले. महामार्गावरही हॉटेल-ढाबे बंद आहे. त्यामुळे उपाशी असल्याचे सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी धीर देत चिंता करू नका, जेवणाची व्यवस्था येथेच केली जाईल, असे त्यांना आश्वस्त केले. त्याचवेळी शिवभोजन केंद्राचे संचालक विकास क्षीरसागर तेथून जात होते. जिल्हाधिकाऱ्यांना पाहून विकास क्षीरसागर थांबले. त्यांना जिल्हाधिकाºयांनी त्या चालक व वाहकाच्या जेवणाची व्यवस्था करण्याची सूचना केली. काही मिनिटातच दोन टिफीन त्या चालक व वाहकाला आणून देण्यात आले. हा संपूर्ण घटनाक्रम एका व्यक्तीने मोबाईलमध्ये टिपला. अर्थात हे जिल्हाधिकाऱ्यांना माहीत नव्हते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSocialसामाजिक