शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कलेक्टर, सीईओ, एसपी सारेच महाराष्ट्रीयन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 05:00 IST

आयएएस असो वा आपीएस लोकसेवा आयोगातून नियुक्ती झाल्यावर प्रत्येक अधिकाऱ्याला स्थानिक भाषेशी दोस्ती करावीच लागते. स्थानिकांची भाषा समजून प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी स्थानिक भाषा अवगत करणे आवश्यकच असते. त्यासाठी या अधिकाऱ्यांना महाराष्ट्रात नियुक्ती होताना आधी मराठीची परीक्षा द्यावी लागते. मात्र, आता अस्सल मराठी अधिकारीच जिल्ह्यात दाखल झाल्याने सामान्य नागरिक अन् प्रशासन प्रमुख यांची खरी जवळीक होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देप्रशासनात मराठी टक्का वाढला : जिल्ह्याच्या ‘वऱ्हाडी’शी समरस

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ‘प्युअर’ मराठी बोलणाऱ्या यवतमाळ जिल्ह्याचे प्रशासन अनेकदा हिंदी व अन्य भाषिक अधिकाऱ्यांच्या हाती सोपविले गेले. ते अधिकारी चांगले असले तरी त्यांच्यापर्यंत प्रश्न घेऊन पोहोचणाऱ्या खेड्यापाड्यातील जिल्हावासीयांना अनेकदा अडचणी येत होत्या; पण आता अनेक वर्षांनंतर जिल्हा प्रशासनाला संपूर्ण मराठी अधिकारी लाभले आहेत. जिल्हा प्रशासनातील हा वाढलेला मराठीचा टक्का जिल्ह्याच्या विकासाला खास ‘मराठी’ स्पर्श देणार का, अशी आशा सामान्य माणसांच्या मनात निर्माण झाली आहे.आयएएस असो वा आपीएस लोकसेवा आयोगातून नियुक्ती झाल्यावर प्रत्येक अधिकाऱ्याला स्थानिक भाषेशी दोस्ती करावीच लागते. स्थानिकांची भाषा समजून प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी स्थानिक भाषा अवगत करणे आवश्यकच असते. त्यासाठी या अधिकाऱ्यांना महाराष्ट्रात नियुक्ती होताना आधी मराठीची परीक्षा द्यावी लागते. मात्र, आता अस्सल मराठी अधिकारीच जिल्ह्यात दाखल झाल्याने सामान्य नागरिक अन् प्रशासन प्रमुख यांची खरी जवळीक होण्याची शक्यता आहे.नवे जिल्हाधिकारी म्हणून अमोल येडगे आले आहेत. ते मूळचे सातारा जिल्ह्यातील आहेत. संपूर्ण बालपण महाराष्ट्रात घालविलेले येडगे यांनी पूर्वी अमरावती जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून काम केले. त्यामुळे वऱ्हाड कसा आहे, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहेत. तर गेल्या वर्षीच यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डाॅ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी पदभार स्वीकारला. तेही मूळचे महाराष्ट्रीय (लातूर) असून मराठी जनमानस त्यांना चांगलेच ठाऊक आहे. तर काही महिन्यांपूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून डाॅ. दिलीप पाटील भुजबळ बुलडाण्यातून यवतमाळात आले. ते मूळचे जुन्नर (पुणे) येथील आहेत.  हे तिन्ही आयएएस, आयपीएस अधिकारी जिल्हा प्रशासनाची धुरा सांभाळत आहेत. महाराष्ट्राच्या मराठीसोबत त्यांचे जन्मजात नाते आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना त्यांना अडचण येत नाही. यवतमाळ जिल्ह्यातील सामान्य माणसे प्रमाण मराठीपेक्षाही अधिक ठसकेदार वऱ्हाडी बोलतात. त्या ‘प्युअर’ भाषेचीही आता या अधिकाऱ्यांनी ओळख करून घेतली आहे. मराठी अधिकाऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे जिल्हावासीयांनाही त्यांच्यापर्यंत आपल्या अडचणी घेऊन जाताना ‘आपलेपणा’ जाणवतो, तो त्यांच्या भाषेमुळेच; पण जिल्ह्यातील प्रश्न ताकदीने सोडवायचे असतील, तर भाषेसोबत स्थानिक जनजीवनही जाणून घेणे आवश्यक आहे.

तब्बल दहा वर्षानंतर लाभले ‘आपलेपण’  जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक हे तिन्ही जिल्हा प्रशासनाचे आधारस्तंभ अस्सल मराठी आहेत. दहा वर्षापूर्वी असा योग डाॅ. हर्षदीप कांबळे, डाॅ. श्रीकर परदेशी आणि हिंमतराव देशभ्रतार यांच्या निमित्ताने साधला गेला. त्यानंतर आता हा ‘आपलेपणा’ पुन्हा परतला आहे. 

 

टॅग्स :marathiमराठी