शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

नवीन सभासदांचा कर्ज मिळण्याचा मार्ग बंद

By admin | Updated: July 17, 2014 00:20 IST

शेतकऱ्यांना कर्ज वितरणासाठी राज्य सहकारी बँकेला जिल्हा मध्यवर्ती बँकेने ४०० कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र प्रत्यक्षात २३० कोटीच मंजुर करण्यात आले. जिल्हा बँकेच्या उद्दीष्टपूर्तीवर

यवतमाळ : शेतकऱ्यांना कर्ज वितरणासाठी राज्य सहकारी बँकेला जिल्हा मध्यवर्ती बँकेने ४०० कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र प्रत्यक्षात २३० कोटीच मंजुर करण्यात आले. जिल्हा बँकेच्या उद्दीष्टपूर्तीवर प्रश्नचिन्ह लागणार आहे. तसेच नवीन सभासदांना कर्ज मिळण्याचा मार्गही बंद झाला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्ज वितरणासाठी राज्य सहकारी बँकेकडे दरवर्षी पैशांची मागणी करते. या पैशावर जिल्हा बँकेचे कर्जवाटप धोरण ठरते. राज्य सहकारी बँक गत तीन वर्षांपासून जिल्ह्याला पुरसे पैसेच देत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे कर्ज वाटपात अडचणी येत आहेत. २०१४-१५ साठी जिल्हा बँकेने राज्य सहकारी बँकेकडे ४०० कोटी रूपयांची मागणी केली होती. प्रत्यक्षात जिल्ह्याला २३० कोटी रूपयेच मंजूर करण्यात आले. जिल्हा बँकेला ६२१ कोटी रूपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. हे उद्दीष्ट पूर्ण करायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.बँकेने सध्यास्थितीत ५३ हजार ४४३ शेतकऱ्यांना ३३० कोटी रूपयांचे कर्ज वितरीत केले आहे. काही कर्ज बँककडे असलेल्या ठेवितून वितरीत केले आहे. त्यामुळे कर्जवाटपाचे उद्दीष्ट ५० टक्केच्या घरात पोहचले आहे. वाटप करण्यात आलेले कर्ज जुन्याच सभासदांना वितरीत करण्यात आल्याने नवीन सभासदांना एक छदामही मिळाला नाही. (शहर वार्ताहर)