शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १२०७ संग्राम केंद्र बंद

By admin | Updated: July 2, 2016 02:32 IST

ग्रामपंचायतीचे कामकाज आॅनलाईन करण्यासाठी आणि विविध संगणकीकृत प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हाभरात सुरू करण्यात आलेले १२०७ संग्राम केंद्र

आर्थिक तरतूदच नाही : आॅनलाईन प्रमाणपत्रांसाठी धावाधाव
रूपेश उत्तरवार यवतमाळ
ग्रामपंचायतीचे कामकाज आॅनलाईन करण्यासाठी आणि विविध संगणकीकृत प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हाभरात सुरू करण्यात आलेले १२०७ संग्राम केंद्र निधी तरतूदीअभावी सध्या बंद पडले आहेत. याचा थेट परिणाम ग्रामपंचायतीच्या व्यवहारावर झाला असून, नागरिकांना आॅनलाईन प्रमाणपत्रासाठी धावपळ करावी लागत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील १२०७ ग्रामपंचातीचा व्यवहार आॅनलाईन करण्यासाठी संग्राम केंद्र प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सुरू करण्यात आले आहे. याठिकाणाहून १९ प्रकारचे प्रमाणपत्र दिले जाते. तसेच संपूर्ण व्यवहारावरही नियंत्रण ठेवले जाते. यासाठी १३ व्या वित्त आयोगातून आर्थिक तरतूद करण्यात आली होती. मात्र आता १४ वा वित्त आयोग जाहीर होताच ही तरतूद बंद करण्यात आली. परिणामी संग्रामकेंद्र बंद पडले. परिणामी नागरिकांना विविध प्रमाणपत्रासाठी आता तालुका अथवा जिल्ह्याचे स्थळ गाठावे लागत आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या व्यवहारावरही त्याचा थेट परिणाम झाला आहे.
संग्रामकेंद्राच्या माध्यमातून गावपातळीवर संपूर्ण कामकाज पारदर्शक करण्यात आले होते. संग्राम केंद्रांच्या माध्यमातून दररोजचा हिशेब ग्रामविकास विभागापर्यंत पोहोचविल्या जात होता. ग्रामपंचायतीच्या कामकाजाचे आॅनलाईन आॅडीट यामुळे सरकार दरबारी जमा होत होते. प्रत्येक पैशाचा हिशेब लागत होता. यातून गैरप्रकारालाही आळा बसला होता. यासोबतच जन्म-मृत्यू, विवाह प्रमाणपत्र, रहिवाशी दाखला, घरटॅक्स आणि पाणीकर वसुलीची पावती संगणकावर उपलब्ध करून दिली जात होती. सदर काम संग्राम केंद्रातील आॅपरेटर दररोज अपडेट करीत होते.
मात्र संग्राम केंद्राच्या निधीसाठी १४ व्या वित्त आयोगात आर्थिक तरतूदच झाली नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्यात करार संपताच संग्राम केंद्र बंद पडले आहे. काही आॅपरेटरांना तर सहा महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. आॅनलाईन कामकाजाकरिता असलेले संगणक आॅपरेटरअभावी ठप्प झाले आहे. नागरिकांना दाखल्यासाठी आता तालुका अथवा जिल्हास्थळ गाठावे लागत आहे.

संग्राम-२ ची घोषणा हवेतच
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत ३० एप्रिलपर्यंत संग्राम टू सुरू करण्याची घोषणा केली होती. संग्राम चालकांना तसे आश्वासनही दिले होते. मात्र दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी संग्राम केंद्र नव्याने सुरू झाले नाही. त्यामुळे आपरेटर संकटात सापडले आहे. आता ग्रामविकास विभाग यावर काय निर्णय घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.