पहिली ते चौथीचे वर्गही दिवाळीनंतर भरणार, शिक्षण मंत्रालयाने घेतला जिल्ह्याचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2021 05:00 IST2021-10-23T05:00:00+5:302021-10-23T05:00:07+5:30
४ ऑक्टोबरला शाळा सुरू होताच लगेच ५ ऑक्टोबरला दीर्घ सुटीचे वार्षिक नियोजनही जाहीर करण्यात आले. त्यामुळे आधीच अर्धे वर्ष सुटीत गेलेेले असताना आता शाळांचे कामकाज उर्वरित कालावधीत कसे पूर्ण होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान दिवाळीची दीर्घ सुटी संपल्यानंतर जिल्ह्यात पहिली ते चौथीचे वर्गही सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाचे नियोजन झाले आहे. मात्र, त्याबाबतचा लेखी आदेश येण्याची प्रतीक्षा केली जात आहे.

पहिली ते चौथीचे वर्गही दिवाळीनंतर भरणार, शिक्षण मंत्रालयाने घेतला जिल्ह्याचा आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात तब्बल दीड वर्षानंतर कशाबशा पाचवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या; पण शाळा सुरू होताच शिक्षकांच्या दीर्घ सुट्यांसाठी गडबड सुरू झाली. ४ ऑक्टोबरला शाळा सुरू होताच लगेच ५ ऑक्टोबरला दीर्घ सुटीचे वार्षिक नियोजनही जाहीर करण्यात आले. त्यामुळे आधीच अर्धे वर्ष सुटीत गेलेेले असताना आता शाळांचे कामकाज उर्वरित कालावधीत कसे पूर्ण होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान दिवाळीची दीर्घ सुटी संपल्यानंतर जिल्ह्यात पहिली ते चौथीचे वर्गही सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाचे नियोजन झाले आहे. मात्र, त्याबाबतचा लेखी आदेश येण्याची प्रतीक्षा केली जात आहे.
चिमुकल्यांना प्रवाहात आणा...
शाळा बंद होत्या तरी ऑनलाईन उपक्रमांद्वारे शिक्षण सुरूच होते. दीर्घ सुट्यांमुळे शिक्षणावर परिणाम होणार नाही. पहिली ते चौथी वर्ग सुरू करण्यासाठी राज्यभर निवेदन दिले होते.
- डाॅ. सतपाल सोवळे, शिक्षक
हवे तर दोन शिप्टमध्ये शाळा भरवा; पण पहिली ते चौथीच्या चिमुकल्यांनाही शाळेच्या प्रवाहात आणा. दिवाळीची सुटी केवळ शिक्षकांना नव्हे तर विद्यार्थ्यांनाही गरजेची आहे. - नंदराज गुर्जर, शिक्षक
वरचे वर्ग सुरू झाल्यामुळे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनाही शाळेत जाण्याची मोठी उत्सुकता लागली आहे. घरी राहून हे चिमुकले कंटाळले आहे. त्यामुळे त्यांचे वर्ग लवकर सुरू झाले पाहिजे. - आसाराम चव्हाण, शिक्षक
पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हीसी
- पहिली ते चौथी वर्गाबाबत शुक्रवारी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांनी सीईओ डाॅ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्याकडून व्हीसीद्वारे आढावा घेतला.
- त्यानुसार दिवाळी सुटी संपताच जिल्ह्यात पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन झाले.