शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडात दोन गटांत हाणामारी

By admin | Updated: June 1, 2016 00:05 IST

क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीत झाले. यात दोन जण गंभीर जखमी झाले.

पोलीस उपनिरीक्षक जखमी : क्षुल्लक वाद, महिलेसह दोन गंभीरपांढरकवडा : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीत झाले. यात दोन जण गंभीर जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या पोलीस निरीक्षकाला लोखंडी रॉड लागल्याने जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री शहरातील इंदिरानगर परिसरात घडली. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आणली. शोभा महादेव तेलंग (३८), मकबुल आणि पोलीस उपनिरीक्षक संजीव खंडारे यात जखमी झाले आहे. शोभाची प्रकृती गंभीर असल्याने तिला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर मकबुलवर पांढरकवडा येथे उपचार सुरू आहे. सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास दोन गटांत क्षुल्लक कारणावरून हाणामारी झाली. हा प्रकार पांढरकवडा पोलिसांना माहीत होताच पोलीस उपनिरीक्षक संजीव खंडारे घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणत असताना लोखंडी रॉड लागल्याने ते जखमी झाले. या हाणामारीमुळे नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती.पोलिसांनी काही वेळात परिस्थिती नियंत्रणात आणली. गर्दीचा फायदा घेत आरोपींनी तेथून पळ काढला. या प्रकरणी शोभा तेलंग यांनी दिलेल्या तक्रारीवरून मकबुल, वसीम, मोहसीन यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला तर मकबुलच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून प्रदीप, निकेश, रामा, बाल्या, गोल्या व इतर चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलीस निरीक्षक संजीव खंडारे यांच्या तक्रारीवरून मकबुल, वसीम, मोहसीन, प्रदीप, नीकेश, रामा, लक्ष्मण, गोल्या, बाल्या आदींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. सध्या परिस्थिती पूर्णत: नियंत्रित आहे. या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले असून या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. (तालुका प्रतिनिधी)