शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शहर विकासाचा आराखडा मंजुरीला; प्रक्षेपित लोकसंख्येसाठी तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 18:13 IST

२०४७ पर्यंतचे नियोजन : मंजुरीची लागली प्रतीक्षा

सुरेंद्र राऊतलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहराच्या विकासाचे भविष्यातील नियोजन करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येतो. यापूर्वी ८ जुलै १९९८ मध्ये यवतमाळ नगरपरिषदेने विकास आराखडा तयार केला होता. साधारणः २० वर्षांनंतर नवीन आराखडा तयार केला जातो. आताचा आराखडा तयार करताना २०४७ पर्यंतचे नियोजन त्यात करण्यात आले आहे. यवतमाळ शहराची २०१६ मध्ये हद्दवाढ झाली. मोठा परिसर शहरात आला. त्यानुसार हा आराखडा तयार झाला आहे.

पूर्वीच्या यवतमाळ शहरापेक्षा आता क्षेत्रफळ वाढले आहे. हद्दवाढीत पिंपळगाव, वाघापूर, डोळंबा, भोसा, उमरसरा, मोहा, लोहारा (एमआयडीसी वगळून), वडगाव आणि यवतमाळ ग्रामीण असा परिसर नगरपरिषदेत समाविष्ट झाला.

पूर्वीची मूळनगरपरिषद आणि वाढीव हद्द असा संयुक्त विकास आराखडा महाराष्ट्र प्रादेशिक नगर नियोजन रचना अधिनयम १९६६ च्या तरतुदीनुसार तयार करण्यात आला. या संभाव्य आराखड्यावर नागरिकांकडून आक्षेप मागविण्यात आले. त्यासाठी हा आराखडा प्रसिद्ध करण्यात आला. २१० आक्षेप आराखड्यावर दाखल झाले. सुनावणी घेऊन समितीने आक्षेपाचे निराकरण केले. आता समितीचा अहवाल तयार झाल्यानंतर नगरपरिषदेने निर्णय घेऊन विकास आराखडा शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्याची प्रक्रिया केली आहे.

८,१५६ हेक्टर क्षेत्रफळाचा 'डीपीआर'मध्ये समावेशहद्दवाढीनंतर शहर विकासासाठी आराखडा तयार केला आहे. त्याला अजून मंजुरी मिळणे बाकी आहे.

५,२५७.२१ हेक्टर क्षेत्र विकसित शहराच्या नव्या विकास आराखड्यात ८ हजार १५६.०१ हेक्टर क्षेत्र दाखविण्यात आले आहे. यापैकी पाच हजार २५७.२१ हेक्टर भाग विकसित आहे. तर दोन हजार ८९८.८ हेक्टर परिसर अविकसित आहे. शहराचा ३५.५४ टक्के भाग अविकसित आहे. हे सर्व विचारात घेऊनच नवा आराखडा तयार करण्यात आला. यात रहिवास क्षेत्र, रस्ते, शाळा, दवाखाने, क्रीडांगण अशा अनेक सुविधा प्रस्तावित केल्या आहेत. त्यासाठी जागेचे आरक्षणही दिले आहे.

प्रक्षेपित लोकसंख्येचे असे आकडे २०३७ पर्यंत शहराची प्रक्षेपित लोकसंख्या तीन लाख ८० हजार तर २०४७ पर्यंत चार लाख ५० हजार प्रक्षेपित लोकसंख्येचे शहर होईल असे पत्र नगर रचनासहसंचालक यांच्याकडून २०२१ मध्ये मिळाले. त्या आधारावरच विकास आराखडाप्रारूप तयार करून प्रसिद्ध केले. आता ते मंजुरीसाठी आहे. नव्या पाठविण्यात येणार आराखड्यानुसार पुढील विकास कामाचे नियोजन केले जाणार आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ