शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाण्यामुळे नागरिक भोगताहेत नरकयातना

By admin | Updated: October 8, 2014 23:33 IST

सांडपाण्याची विल्हेवाट लागावी यासाठी अनेक ठिकाणच्या सदनिकांनी कुठलीही व्यवस्था केली नाही. या सदनिकांमधील घाण पाणी मोकळ्या जागेत बिनधास्त सोडून दिल्याने संबंधित परिसरात

यवतमाळ : सांडपाण्याची विल्हेवाट लागावी यासाठी अनेक ठिकाणच्या सदनिकांनी कुठलीही व्यवस्था केली नाही. या सदनिकांमधील घाण पाणी मोकळ्या जागेत बिनधास्त सोडून दिल्याने संबंधित परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागत आहे. डासांचा प्रादुर्भाव आणि दुर्गंधीमुळे होणारा त्रास असह्य आहे. प्रामुख्याने लोहारा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या सदनिकांविषयी हा प्रश्न गंभीर आहे. सदर ग्रामपंचायत क्षेत्रात दारव्हा मार्गावर असलेल्या अनेक सदनिकांमधील पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या तयार करण्यात आलेल्या नाहीत. विशेषत: एकवीरा चौकानजीकच्या सदनिका नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सांडपाणी मोकळ्या जागेत सोडून देण्यात आले आहे. मातोश्री नगराला लागून असलेल्या सदनिकेतील पाण्यामुळे तर मोठी गटारगंगा तयार झाली आहे. याठिकाणी दोन महिन्यांआधी मुरमाचे ढीग टाकून पाणी वाहने तेवढे थोपविले. आता मात्र त्या ठिकाणी तलावसदृश स्थिती निर्माण झाली आहे. राऊतनगरात असलेल्या सदनिकेचे सांडपाणी दारव्हा मार्गाकडे जाणाऱ्या रुळालगत सोडून देण्यात आले. नागरी वस्ती असलेल्या भागात हे पाणी थोपले गेले. यापाण्यामध्ये जनावरांचा मुक्त संचार सुरू असतो. शिवाय महावीरनगरच्या बाजूला असलेल्या काही सदनिकांच्या पाण्यानेही यामध्ये भर पडली आहे. पावसाळ्यात तर डांबरीकरण झालेल्या रस्त्यावरून सांडपाणी वाहून जात असल्याने नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे स्वतंत्र जलस्रोत दूषित होतात. यापासून त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अलीकडेच दारव्हा मार्गावर निर्माण झालेल्या एका सदनिकेलगत जुन्या सदनिकेतील सांडपाण्याचे भलेमोठे डबके तयार झाले आहे. केवळ मुरूम टाकून तयार करण्यात आलेल्या रस्त्यावरून पाणी वाहते. या मार्गावरून वाहतुकीचे प्रमाण कमी असले तरी परिसरात वास्तव्याला असणाऱ्या नागरिकांना मात्र नाकाला रूमाल लावून ये-जा करावी लागते. एवढी परिस्थिती गंभीर असतानाही लोहारा ग्रामपंचायतीला मात्र याविषयी काहीही सोयरसुतक नसल्याचे दिसून येते. (वार्ताहर)