शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या विरोधात शिक्षकांची धडक

By admin | Updated: July 23, 2014 00:13 IST

वणी पंचायत समितीतील प्रभारी गट शिक्षणाधिकाऱ्यावर तत्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी शिक्षकांनी जिल्हा परिषदेत धडक दिली. सीईओंना निवेदन देऊन तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली.

यवतमाळ : वणी पंचायत समितीतील प्रभारी गट शिक्षणाधिकाऱ्यावर तत्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी शिक्षकांनी जिल्हा परिषदेत धडक दिली. सीईओंना निवेदन देऊन तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली. वणी पंचायत समितीतील गट शिक्षणाधिकारी व्ही.डी. ढवळे यांच्या कामकाजाला शिक्षक त्रस्त झाले. नियमाला डावलून अनेक कामे त्यांनी केली आहे. या गटशिक्षणाधिकाऱ्या विरोधात तक्रार करून अनेक पुरावे दिले. त्यानंतरही कोणतीच कारवाई झाली नाही. प्रशासनाकडून उलट पाठराखण केली जाते. गैरप्रकार व फसवणूक करण्यासाठी कित्येकदा तर पाठबळही देण्यात आले आहे. जून २०१३ मध्ये पंचायत समिती अंतर्गत ४० शिक्षकांच्या बदल्या झाल्या. यात अंशत: बदल करून पदे रिक्त नसतानाही ११ शिक्षकांच्या बदल्या केल्या. गटविकास अधिकाऱ्याचा तात्पुरता प्रभार आल्यानंतर व्ही.डी. ढवळे यांनी नऊ शिक्षकांच्या बदल्या केल्या. यासाठी आर्थिक देवान-घेवान केल्याचा आरोपही प्राथमिक शिक्षक संघाने केला आहे. खोटी माहिती देऊन ५६ हजार रुपये घरभाडे भत्त्याची उचल केली. त्यांनी आपली दौरा दैनंदिनी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे कधीच सादर केली नाही. आनंद महोत्सवासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारातून वसुली केली. कब बुलबुल मेळावा घेताना विद्यार्थी व शिक्षकांना जाणीवपूर्वक वंचित ठेवण्यात आले. पंचायत समिती कार्यालयात बसून प्रकरणाचा निपटारा करण्याकडे ढवळे यांचा कल आहे. यासह तब्बल १२ प्रकारचे विविध आरोप प्राथमिक शिक्षक संघाने केले आहे. या प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी शरद इंगळे, प्रमोद ढेंगळे, रायकर यांच्यासह वणी पंचायत समितीतील शिक्षकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, शिक्षण सभापती मनमोहनसिंग चव्हाण यांच्याकडे केली आहे. या वेळी जिल्हा परिषद सदस्य आशिष खुलसंगे उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)