शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची मुले बनणार सनदी अधिकारी

By admin | Updated: July 1, 2016 02:36 IST

यशाची शिखरे गाठण्याची धडपड करणरी शेतकरी कुटुंबातील पाल्यांना मदत करण्यात येत आहे.

बळीराजा चेतना अभियान : तीन शेतकरी पुत्रांना स्पर्धा परीक्षा तयारीसाठी मदत
यवतमाळ : यशाची शिखरे गाठण्याची धडपड करणरी शेतकरी कुटुंबातील पाल्यांना मदत करण्यात येत आहे. बळीराजा चेतना अभियान आणि जिल्हा पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त उपक्रमातून तीन शेतकरी पुत्रांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी प्रत्येकी ५ हजार रूपयांची मदत करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाकडून अभियानास मिळालेल्या निधीतून ही मदत करण्यात आली आहे. या शेतकरी पुत्रांना जिल्हाधिकारी सिंह, एसली अखिलेशकुमार सिंग यांनी पाल्यांना शुभेच्छा दिल्या.
जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील जे पाल्य परीक्षेची तयारी करीत आहेत, ज्यांनी एखाद्या परिक्षेची पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली असून मुख्य परीक्षा किंवा मुलाखत देण्यास काही आर्थिक अडचणी आहे. अशा तालुक्यातील दोन शेतकरी पाल्यांना बळीराजा चेतना अभियान आणि जिल्हा पोलिस प्रशासन अंतर्गत स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी मदत करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलेला होता. त्यानुसार पुसद तालुक्यातील गोविंदनगर (काकडदाती) येथील सुशील रामकृष्ण पेंटेवाड यांना पाच हजारांची मदत करण्यात आली. सुशिल पेंटेवाड यांनी पोलिस उपनिरीक्षक पदाची पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाले. पुसद तालुक्यातील लक्ष्मीनगर बोरगडी येथील कृतिका वसंतराव गायकवाड हिने महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली आहे. नेर तालुक्यातील गोपाल पुडंलिक घुघाने याने विक्रीकर निरीक्षक या पदाची पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांना पुढील परीक्षा देण्यास आर्थिक अडचण येऊ नये यासाठी प्रत्येकी पाच हजारांची मदत बळीराजा चेतना अभियान समितीच्या लोकसहभाग निधीतून देण्यात येणार आहे.
शेतकरी कुटुंबातील शेतकरी पाल्यांनी एखादी स्पर्धा परीक्षा देऊन त्या स्पर्धा परिक्षेमध्ये प्रतिक्षाधीन म्हणून असेल व उमेदवाराची निवड झाली नसेल. तसेच अधिक तयारी करण्याकरिता उमेदवाराला काही आर्थिक अडचण असेल, अशाही शेतकरी पाल्यांनी यासाठी संबंधित तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना अभियान कक्षात आतापर्यंत पूर्व परीक्षेत मिळवलेले यश व यापूर्वीच्या परिक्षांच्या निकालाची प्रत आदी कागपत्रासह प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे. (प्रतिनिधी)