शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पंचरंगी लढतीने निवडणुकीत प्रचंड चुरस

By admin | Updated: October 9, 2014 23:09 IST

वणी विधानसभा मतदार संघात पंचरंगी लढतीने निवडणुकीत चांगलीच चुरस वाढली आहे. उमेदवारांची दमछाक अन् कार्यकर्त्यांची आता सत्व परीक्षा आहे.

वणी : वणी विधानसभा मतदार संघात पंचरंगी लढतीने निवडणुकीत चांगलीच चुरस वाढली आहे. उमेदवारांची दमछाक अन् कार्यकर्त्यांची आता सत्व परीक्षा आहे.कॉंग्रेस, सेना, राष्ट्रवादी, भाजप आणि मनहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तगडे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याशिवाय डावी आघाडी, बसपा, गोंगपा आणि अपक्ष उमेदवारही रणांगणात कायम आहेत. एकूण १३ उमेदवारांमध्ये लढत होत आहे. मात्र खरी लढत पाच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमध्येच होत आहे. त्यामुळे या पाचही उमेदवारांनी प्रचारासाठी धावपळ सुरू केली आहे. गावोगावी, खेडोपाडी पोहोचून उमेदवार मते मागताना दिसत आहे. उमेदवारांचा दिवस दररोज पहाटेच सुरु होत आहे. दिवस उगविल्यानंतर त्यांचे प्रचार कार्य सुरू होते. रात्री २ ते ३ वाजतापर्यंत ते गावोगावी जातात. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून त्यांची चांगलीच झोपमोड झाली आहे. त्यातच प्रतिस्पर्धी उमेदवारांची एमकेकांना धास्ती असल्याने सर्वच उमेदवार रात्रीचा दिवस करीत आहेत. प्रचारासाठी आता अवघे चार दिवस शिल्लक असल्याने त्यांची तारांबळ उडत आहे. उमेदवारांसोबतच त्यांच्या सच्चा कार्यकर्त्यांचीही झोपमोड झाली आहे. मात्र असे कार्यकर्ते बहुतांश पक्षांजवळ फारच कमी आहे. केवळ मनसेकडे अशा कार्यकर्त्यांची फौज तयार आहे. सर्वच पक्षांना कार्यकर्त्यांची कमतरता जाणवत आहे. काही पक्षांनी तर रोजंदारीवर कार्यकर्त्यांना प्रचारात जुंपले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील काही बेरोजगार युवकांना रोजगार प्राप्त झाला आहे. त्यातही शेतीच्या मजुरीपेक्षा जादा मजुरी मिळत असल्याने त्यांना सुगीचे दिवस आले आहेत. त्यांची चांगलीच चंगळ होत आहे. मात्र मनस्वी कार्यकर्ते नसल्याने या उसण्या कार्यकर्त्यांच्या भरवशावर विजय कसा मिळवावा, असा प्रश्न काही उमेदवारांना पडला आहे. खरे कार्यकर्ते बोटावर मोजण्याइतपत असल्याने त्यांची बोबडी वळली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)