शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
4
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
5
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
6
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
7
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
8
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
9
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
10
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
11
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
12
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
13
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
16
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
17
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
18
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
19
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
20
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजिल्हा वाहतुकीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 05:00 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे १८ हजार ५०० बसेस आहे. लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी या सर्व बसेस पूर्ण क्षमतेने प्रवाशांची वाहतूक करीत होत्या. एक किलोमीटरमागे ३० ते ३५ रुपये आवक, असे एसटीच्या उत्पन्नाचे ढोबळमानाने सूत्र आहे. मात्र विविध कारणांमुळे उत्पन्नाच्या या आकड्यापर्यंतही एसटी पोहोचू शकत नव्हती. २२ ते २३ रुपये उत्पन्न येत होते. परिणामी मागील काही वर्षात एसटीचा तोटा वाढत गेला आहे.

ठळक मुद्देएसटीचा तोटा वाढणार : दररोज ११ कोटी नुकसानीची भीती, किलोमीटरमागे ३५ रुपये उत्पन्न हवे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू असताना ‘एसटी’ला किलोमीटरमागे दहा रुपयांचा तोटा सहन करावा लागत होता. आता कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निम्मे प्रवासी घेऊन वाहतूक करावी लागत आहे. खर्च निघनेही कठीण होऊन बसले आहे. या परिस्थितीत आंतरजिल्हा वाहतूक सुरू करण्याचे एसटीपुढे मोठे आव्हान असणार आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे १८ हजार ५०० बसेस आहे. लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी या सर्व बसेस पूर्ण क्षमतेने प्रवाशांची वाहतूक करीत होत्या. एक किलोमीटरमागे ३० ते ३५ रुपये आवक, असे एसटीच्या उत्पन्नाचे ढोबळमानाने सूत्र आहे. मात्र विविध कारणांमुळे उत्पन्नाच्या या आकड्यापर्यंतही एसटी पोहोचू शकत नव्हती. २२ ते २३ रुपये उत्पन्न येत होते. परिणामी मागील काही वर्षात एसटीचा तोटा वाढत गेला आहे.पूर्ण लॉकडाऊन काळात एसटीला दररोज २२ कोटी रुपयांचा फटका बसत होता. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर जिल्ह्यांतर्गंत वाहतूक सुरू करण्यात आली आहे. क्षमतेपेक्षा निम्मे प्रवासी घेऊन वाहतूक करावी लागत आहे. एवढेही प्रवासी मिळविण्यासाठी एसटीला ‘आवाज’ मारण्याची वेळ आली आहे. तास-दीड तासात मिळेल तेवढे प्रवासी घेऊन एसटी मार्गस्थ होत आहे. मार्गात कुठेही थांबायचे नसल्याने थेट प्रवासी घेऊन बस निघत आहे. खर्च अधिक आणि उत्पन्न कमी आहे.आंतरजिल्हा वाहतूक सुरू झाल्यानंतर सव्वाशे ते दीडशे किलोमीटरपर्यंत एसटीचा प्रवास होणार आहे. शंभर किलोमीटरमागे तीन हजार ५०० रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. निम्मे २२ प्रवाशाचे तिकीट भाडे १२५ रुपये झाल्यास दोन हजार ७५० रुपये एवढेच उत्पन्न येते. शंभर किलोमीटर मागे ७५० रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. जाण्या-येण्याच्या एका फेरीमागे १५०० रुपयांचा दणका एसटीला बसतो. आज २२ प्रवासी मिळणे कठीण झाले आहे. आंतरजिल्हा प्रवासी मिळण्यासाठी एसटीच्या नाकीनऊ येणार आहे. त्यामुळेच या वाहतुकीचे मोठे आव्हान एसटीपुढे आहे. आंतरजिल्हा वाहतूक सुरू करणे आवश्यकच आहे. मात्र एसटीचे नुकसान होणार नाही, ही बाबही लक्षात घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. दरम्यान, गुरुवारपासून आंतरजिल्हा वाहतुकीला सुरूवात होत आहे.संपूर्ण भाड्याचा आकार सरकारने द्यावाजिल्हा बाहेर वाहतूक सुरू करताना प्रवासी आणि कर्मचारी यांची सुरक्षा सांभाळणे आवश्यक आहे. सोशल डिस्टन्सिंगमुळे २२ प्रवासी वाहतूक करावी लागणार आहे. हे महामंडळ जनतेचे आणि सरकारचे आहे. तेव्हा एसटीचा वाढता तोटा लक्षात घेता संपूर्ण भाड्याचा आकार सरकारने एसटीला वेळेवर देणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी नोंदविली आहे.

टॅग्स :state transportएसटी