शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

निष्क्रिय ग्रामसेवकांना ‘सीईओं’नी फटकारले

By admin | Updated: February 27, 2015 01:36 IST

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी गुरुवारी येथील पंचायत समितीच्या सभागृहात विविध विकासकामांचा आढावा घेतला.

कळंब : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी गुरुवारी येथील पंचायत समितीच्या सभागृहात विविध विकासकामांचा आढावा घेतला. कर्तव्यात कसूर करणाऱ्या ग्रामसेवकांना त्यांनी चांगलेच फटकारले. हलगर्जीपणा आणि हयगय यापुढे खपऊन घेतली जाणार नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. जलयुक्त शिवार अभियान, स्वच्छ भारत अभियान, वृक्ष लागवड, इंदिरा आवास घरकूल योजना, कॅशबुक अपडेट करणे, मागासक्षेत्र अनुदान विकास निधी आदी विभागातील कामांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट अनेक ग्रामसेवकांनी पूर्ण केले नाही, याविषयी त्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. शौचालय बांधकामाचा वेग वाढवा. त्यासाठी महिला बचत गटाची मदत घ्या. गावात मुक्काम करा, असे आदेशही त्यांनी दिले. अपूर्ण घरकुलाचे बांधकाम तत्काळ पूर्ण करा, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरू असलेली कामे, सूक्ष्म नियोजन प्रक्रिया याचीही माहिती त्यांनी घेतली. लावलेली जास्तीत जास्त वृक्ष जिवंत कसे राहतील यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. पंचायत समितीमार्फत होणाऱ्या कामांची त्यांनी ग्रामपंचायतनिहाय आढावा घेतला. यावेळी गटविकास अधिकारी डॉ.मनोहर नाल्हे, शाखा अभियंता तुषार परळीकर, अशोक कयापाक, विस्तार अधिकारी अशोक ठाकरे, रमेश केळकर, कृषी अधिकारी किशोर अंबरकर, पंकज बरडे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)