शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
4
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
5
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
6
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
7
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
8
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
9
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
10
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
11
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
12
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
13
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
16
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
17
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
18
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
19
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
20
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
Daily Top 2Weekly Top 5

नरभक्षक वाघीण कैद, इतर वाघांनाही पकडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 05:00 IST

पांढरकवडा विभागात नरभक्षक वाघिणीची प्रचंड दहशत होती. तिने सहा जनावरांची शिकार केली. तिच्या हल्ल्यात एक वृद्ध महिला मृत्युमुखी पडली. या वाघिणीला पकडण्यासाठी नागरिकांमधून वन खात्यावर प्रचंड दबाव निर्माण करण्यात आला होता. अखेर मेळघाटातील विशेष कृती दलाची मदत घेऊन बुधवारी सकाळी ही वाघीण १०.३० वाजता बेशुद्ध करून पकडण्यात आली.

ठळक मुद्देगावकऱ्यांचे साकडे : २७ ट्रॅप कॅमेरांनी टिपले

लोकमत न्यूज नेटवर्कपाटणबोरी : पांढरकवडा तालुक्यात मानव व प्राण्यांची शिकार करून धुमाकूळ घालणाºया वाघिणीला वन विभागाने पकडण्यात यश मिळविले. त्यासोबतच टिपेश्वर अभयारण्याच्या बाहेर इतर वाघांचा मुक्त संचार असल्याने त्यांच्यापासून गावकऱ्यांच्या जीविताला धोका आहे. त्यामुळे या फिरणाऱ्या वाघांनाही जेरबंद करावे यासाठी बुधवारी गावकऱ्यांनी वन अधिकाऱ्यांना साकडे घातले.पांढरकवडा विभागात नरभक्षक वाघिणीची प्रचंड दहशत होती. तिने सहा जनावरांची शिकार केली. तिच्या हल्ल्यात एक वृद्ध महिला मृत्युमुखी पडली. या वाघिणीला पकडण्यासाठी नागरिकांमधून वन खात्यावर प्रचंड दबाव निर्माण करण्यात आला होता. अखेर मेळघाटातील विशेष कृती दलाची मदत घेऊन बुधवारी सकाळी ही वाघीण १०.३० वाजता बेशुद्ध करून पकडण्यात आली. या वाघिणीला शोधण्यासाठी जंगलात वन विभागाने तब्बल २७ ट्रॅप कॅमेरे लावले होते. त्यात ती कैद झाली आणि पकडली गेली. वृद्धेची शिकार केल्यानंतर अवघ्या दोन-तीन दिवसात या वाघिणीला जीवंत पकडण्यात वन खात्याला यश आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वनमंत्री संजय राठोड, आर्णी-केळापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी वन खात्याच्या कामगिरीचे कौतुक केले.गेल्या काही दिवसांपासून पाटणबोरी परिसरात हल्लेखोर वाघिणीसह अनेक वाघांचा मुक्तसंचार सुरू आहे. त्यामुळे या परिसरात फिरणाऱ्या सर्वच वाघांना वनविभागाने जेरबंद करावे, अशी मागणी गावकऱ्यांनी बुधवारी पांढरकवडा वनपरिक्षेत्राचे उपवनसंरक्षक एस.आर.दुमोरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सुभाष कायतवार यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या मृत झालेल्या महिलेच्या कुटुंबाला आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी, वाघाच्या दहशतीमुळे शेतीकाम ठप्प पडले आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. याचे सर्व्हेक्षण करून नुकसान भरपाई देण्यात यावी, मजुरीची कामे ठप्प पडली असून मजुरांना मजुरी उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.बुधवारी पकडल्या गेलेल्या वाघिणीची नागपूर येथील अस्थाई उपचार केंद्रात रवानगी करण्यात आली. ही नरभक्षक गावात जाऊ नये म्हणून सात किलोमीटर क्षेत्राला चेनलिंग फेन्सींग करण्यात आले होते.गेल्या काही दिवसांपासून पाटणबोरी परिसरात हल्ले करित असलेल्या वाघिणीला जेरबंद करण्याचे आदेश २१ सप्टेंबरला प्राप्त झाले. त्यानुसार युद्धपातळीवर हल्लेखोर वाघिणीचा शोध घेऊन तिला पकडण्यात आले आहे. यामुळे तूर्तास वाघ-मानव संघर्षाला पुर्णविराम मिळाला आहे.- एस.आर.दुमोरेउपवनसंरक्षक, पांढरकवडा

टॅग्स :forestजंगल