शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवार मतदारांच्या दारात

By admin | Updated: November 5, 2016 00:12 IST

नगरपरिषद निवडणुकीत नामांकन मागे घेण्याची अंतिम मुदत ११ नोव्हेंबर असली तरी आतापासूनच अनेक उमेदवार मतदारांच्या दारात पोहोचले आहे.

विड्रॉलसाठी सात दिवस : आठ नगरपरिषदांत पाच लाख मतदारयवतमाळ : नगरपरिषद निवडणुकीत नामांकन मागे घेण्याची अंतिम मुदत ११ नोव्हेंबर असली तरी आतापासूनच अनेक उमेदवार मतदारांच्या दारात पोहोचले आहे. प्रचाराचा अधिकृत नारळ फोडण्यापूर्वी प्रत्येक उमेदवाराने आपली व्यक्तिगत यंत्रणा कामाला लावली असून सकाळ-संध्याकाळ मतांचा जोगवा मागताना दिसत आहे. जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून बुधवारी उमेदवारांच्या अर्जाची छाननी झाली. आठ नगरपरिषदांतील ३७० नामांकन अर्ज छाननीत बाद झाले. १२४७ अर्ज मंजूर झाले. आता उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख ११ नोव्हेंबर आहे. निवडणुकीचे अद्याप चित्र स्पष्ट नाही. परंतु अनेक उमेदवारांनी आपल्या व्यक्तिगत प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रत्येक प्रभागात उमेदवाराकडून मतदारांची मनधरणी सुरू केली आहे. उमेदवार आपला माहोल तयार करण्यासाठी कार्यकर्त्यांची विशेष बडदास्त ठेवत आहे. जाहीर प्रचारासाठी पक्षाकडून मिळणाऱ्या साहित्याची वाट न बघता उमेदवारांनी वैयक्तिक प्रचार साहित्यांचा वापर सुरू केला आहे. यासाठी खास शैलीतील पत्रके वाटली जात आहे. यामध्ये त्या-त्या प्रभागातील समस्यांवर भर दिला जात आहे. प्रभागातील राजकीय घडामोडींचा फायदा घेण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. आता मतदारांमध्येही जाहीर प्रचाराची क्रेझ राहिली नाही. त्यामुळे थेट भेटीवरच भर दिला जात आहे. उमेदवार आपली भूमिका समजावून सांगत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी जेवणावळीही उठत आहे. पक्षाकडून प्रचारसाहित्य आणि निधीहीची प्रतीक्षा न करता अनेकांनी नगरसेवक होण्यासाठी आपला खिसा सैल केला आहे. तर काहींनी विधान परिषदेतील उमेदवाराकडून ‘टोकन’ मिळविण्यासाठी धडपड चालविली आहे. त्याच गंगाजळीवर नगरपरिषद निवडणुकीचे नियोजन केले जात आहे. सर्वाधिक मतदार यवतमाळात आठ नगरपरिषदेपैकी सर्वाधिक मतदार यवतमळात असून ४ लाख ६९ हजार ५७७ मतदारपैकी २ लाख ३३ हजार १५० मतदार आहेत. पुसद ५५ हजार ७६७, वणी ४५ हजार ९२३, उमरखेड ३६ हजार ९३९, दिग्रस ३१ हजार ७८७, दारव्हा २७ हजार ७५, आर्णी २३ हजार ३९३ तर घाटंजीत १५ हजार ५४३ मतदार आहेत. नगराध्यक्षाच्या आठ जागेसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांनी तर रात्रीचा दिवस केला आहे. यवतमाळात लढतांना विधानसभे इतकेच नियोजन करावे लागत आहे. एकट्यास शहरात २९१ मदतान केंद्र राहणार आहे. त्यानुसार बुथ रचना करण्याची कसरत आहे. चिन्हाची प्रतीक्षाअपक्ष उमेदवाराकडे चिन्ह नसल्याने त्यांना प्रचार करताना अडचण येत आहे. ११ नोव्हेंबरला दुपारी तीन नंतर चिन्ह वाटपाची प्रक्रिया पाड पडणार आहे. तोपर्यंत तरी अपक्षांना केवळ मी उमेदवार आहे इतकेच मतदारांना सांगत आहे.