शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
5
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
6
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
7
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
8
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
9
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
10
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
11
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
12
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
13
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
14
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
15
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
16
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
17
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
18
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
19
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
Daily Top 2Weekly Top 5

मद्यसम्राटांचा बचाव व न्यायालयाचा अवमान करणारा प्रतिज्ञालेख रद्द करा

By admin | Updated: May 31, 2017 00:28 IST

मद्यसम्राटांचा युक्तीपूर्ण बचाव व न्यायालयाचा अवमान करणारा तसेच दिलेल्या लेखी हमीची पूर्तता न करू शकणारा

सेंटर फॉर जस्टीसची मागणी : हस्तांरित रस्त्यांच्या देखभालीचा उल्लेख नाही लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : मद्यसम्राटांचा युक्तीपूर्ण बचाव व न्यायालयाचा अवमान करणारा तसेच दिलेल्या लेखी हमीची पूर्तता न करू शकणारा तो प्रतिज्ञालेख रद्य करण्याची मागणी सेंटर फॉर जस्टिसचे संचालक प्रा. डॉ. प्रदीप राऊत यांनी राज्यपालांकडे केली आहे. दारूने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले तरी चालतील पण यवतमाळच्या मद्यसम्राटांची ६४ दुकाने वाचली पाहिजे, यासाठी जीवाचे रान करणारे पालकमंत्री यांनी सर्वप्रथम सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना २६ डिसेंबर २०१६ रोजी तातडीने पत्र देऊन यवतमाळ नगर परिषद हद्दीतील १४ किलोमिटरच्या राज्य मार्गांना डि-क्लासिफाय अर्थात, अवर्गीकृत दर्जा देण्याची मागणी केल्याने याचा अर्थशास्त्रीय विचार करून शासनाचे अवर सचिव प्रशांत पाटील यांनी २० जानेवारी २०१७ च्या खास आदेशान्वये मुख्याधिकाऱ्यांना केवळ तीन नाममात्र अटींची पूर्तता करणारे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगून दारूच्या दुकानांना अभय दिल्याचा आरोप प्रदीप राऊत यांनी केला आहे. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांचा हा प्रतिज्ञालेख रद्द करण्याची मागणी प्रा. राऊत यांनी केली आहे. उल्लेखनिय म्हणजे सदर प्रतिज्ञालेखातील दोन अटी रस्त्याचे अंतर व अतिक्रमनाच्या दक्षतेविषयी असून तिसरी मुख्य अट देखभाल व दुरुस्तीशी सबंधित आहे. मात्र ३९ कोटींचे कर्ज असणारी नगर परिषद हस्तांतरीत रस्त्यांची देखभाल कशी करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तहसीलदारांनी सर्व आरोपांचा व नगर परिषदेवर असलेल्या कर्जाचा कायदेशीर खुलासा राज्यपालांकडे करावा व लोकआग्रहास्तव स्वत:हूनच ते प्रतिज्ञापत्र रद्द करण्याची मागणी शासनाच्या २२ मार्च १०६ च्या निर्णयाचा संदर्भ द ेऊन करण्यात आली आहे. असे न केल्यास जनहित याचिकेद्वारा योग्य न्यायासाठी न्यायालयात जाण्याचा इशारा सेंटर फॉर जस्टिसचे संचालक प्रा. डॉ. प्रदीप राऊत यांनी दिला आहे.