लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकऱ्याने घाम गाळून पिकविलेला भाजीपाला बाजार समितीत नाममात्र किमतीत व्यापारी क्विंटलने खरेदी करतात. हाच भाजीपाला विक्रेत्यांच्या माध्यमातून किलोने विकताना ग्राहकांना चार ते नऊ पट अधिक दर आकारला जातो. व्यापाऱ्यांच्या या नफेखोरीत शेतकरीच नव्हेतर सामान्य ग्राहकसुद्धा लुटला जातो आहे. व्यापाऱ्यांच्या या दरावर एक तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे कोणतेच नियंत्रण नसावे अथवा वैयक्तिक लाभापोटी बाजार समितीचे कर्तेधर्ते याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असावे, असे दिसते.यवतमाळच्या बाजारात वांग्याचे ठोक दर ५० ते १०० रूपये कट्टा आहेत. एका कट्ट्यात ३० ते ४० किलो वांगे बसतात. यानुसार शेतकऱ्यांना एक ते सव्वा रूपये किलो वांगे पडत आहेत. बाजारातला हा दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही. अशीच अवस्था कोबीची आहे. कोबीच्या एका कट्ट्यात ६० ते ७० किलोचे नग बसतात. त्याचा दर १५० ते २०० रूपयांपर्यंत आहे. दर आणि असलेले वजन यानुसार कोबीला किलोमागे केवळ २ रूपयांचा दर पडत आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात कोबी आणि वांग्यांची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, दर मिळत नसल्याने कोबी आणि वांगे उत्पादक शेतकºयांना फटका बसला आहे.व्यापाऱ्यांच्या नफेखोरीने शेतकरी नाडलावांगे आणि कोबी स्वस्त असली तरी भाजीपाला विक्रेते सर्वसामान्य ग्राहकांना १० ते २० रूपये किलो दरानेच वांगे आणि कोबी विकत आहे. एका किलोवर नऊ पट नफा मिळविला जात आहे. ज्या शेतकºयांमुळे व्यापाºयांना रोजी मिळते, त्या शेतकऱ्यांना पायदळी तुडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे भविष्यात भाजीपाला उत्पादकांसाठी धोक्याची घंटा मिळाली आहे.शासकीय यंत्रणा अपयशीबियाणे, लागवड, खत आणि फवारणीसह भाजीपाला तोडणीचा खर्च मोठा आहे. यानंतरही शेतकऱ्यांचा शेतमाल कवडीमोल दरात खरेदी केला जात आहे. शेतकऱ्यांच्या या लुटीला आळा घालण्यात शासकीय यंत्रणा मात्र असमर्थ ठरली आहे.क्लस्टर गेले कुठे?शेतकरी ते ग्राहक असा थेट व्यवहार घडविण्यासाठी बळीराजा चेतना अभियानातून बाजारपेठ उभारण्यात आली. आठ दिवसात ही बाजारपेठ बंद पडली. स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालय आणि गार्डन रोडवरील नर्सरीतील हे केंद्र आता नावालाच उरले आहे.बाजारात शेतमालाला संरक्षण नाही. व्यापारी वाट्टेल त्या दरात शेतमालाची खरेदी करत आहे. यामुळे वांगे घेऊन येणाऱ्या वाहनाचे भाडेही निघणे अवघड झाले आहे.- प्रमोद शेंदूरकर,तरोडा, ता. दारव्हाव्यापार करताना व्यापारी प्रत्येक खर्च वसूल करतो. मात्र शेतकरी कधी तसा विचार करीत नाही. यामुळे शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. यावर निर्बंध लावण्यासाठी ठोस उपाययोजना असाव्या.- सुनील राठोड, तिवसा
क्विंटलने खरेदी, किलोने विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 22:15 IST
शेतकऱ्याने घाम गाळून पिकविलेला भाजीपाला बाजार समितीत नाममात्र किमतीत व्यापारी क्विंटलने खरेदी करतात. हाच भाजीपाला विक्रेत्यांच्या माध्यमातून किलोने विकताना ग्राहकांना चार ते नऊ पट अधिक दर आकारला जातो. व्यापाऱ्यांच्या या नफेखोरीत शेतकरीच नव्हेतर सामान्य ग्राहकसुद्धा लुटला जातो आहे.
क्विंटलने खरेदी, किलोने विक्री
ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला कवडीमोल भाव : ग्राहकांना मात्र चौपट दर