शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डरला जिल्हा ग्राहक न्यायालयाची चपराक

By admin | Updated: August 26, 2015 02:43 IST

ले-आऊटमध्ये नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या नसल्याचा ठपका ठेवत येथील बिल्डरला जिल्हा ग्राहक न्यायालयाने दंड ठोठावण्यासोबतच

तुळजानगरीत असुविधा : १६ जणांना प्रत्येकी पाच हजार देण्याचा आदेशयवतमाळ : ले-आऊटमध्ये नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या नसल्याचा ठपका ठेवत येथील बिल्डरला जिल्हा ग्राहक न्यायालयाने दंड ठोठावण्यासोबतच सुविधा निर्माण करण्याचा आदेश दिला आहे. या निर्णयामुळे स्थानिक आर्णी रोडवरील तुळजानगरी भाग-२ मधील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मे.टी.के. असोसिएटचे संचालक प्रशांत श्रीधरराव थोडगे आणि विवेक श्रीधरराव किनकर यांनी तुळजानगरी भाग-२ मधील प्लॉटची विक्री केली. मात्र रस्ते, नाल्या, पथदिवे, पिण्याचे पाणी आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या नाही. याचा त्रास सदर भागातील नागरिकांना झाल्याने त्यांनी ले-आऊट मालकांशी वारंवार संपर्क केला. सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. परंतु दखल घेण्यात आली नाही. विशेष म्हणजे प्लॉटची खरेदी करून देताना विकास निधीच्या नावाखाली प्रत्येकी १५ हजार रुपये घेण्यात आले. विकास तर दूर साध्या आवश्यक सुविधाही उपलब्ध करून दिल्या नाही. त्यामुळे या भागातील १६ नागरिकांनी जिल्हा ग्राहक न्यायालयात धाव घेतली. न्याय मंचचे अध्यक्ष प्रकाश जाधव, सदस्य अ‍ॅड.आश्लेषा दिघाडे आणि डॉ. अशोक सोमवंशी यांच्या उपस्थितीत या तक्रारीवर युक्तिवाद झाला. टी.के. असोसिएटचे थोडगे आणि किनकर यांनी तुळजानगरी भाग-२ मध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या नाही, हे सिद्ध झाले. त्यामुळे मंचाने तक्रार अंशत: मंजूर केली आहे. तुळजानगरी भाग-२ मध्ये रस्ते, नाल्या, पथदिवे, पाणी या सुविधा सहा महिन्यांच्या आत उपलब्ध करून द्याव्या, सुविधा न पुरविल्यास प्रत्येक तक्रारकर्त्यास दरमहा ५०० रुपये नुकसान भरपाई काम पूर्ण होईपर्यंत द्यावी, मानसिक व शारीरिक त्रासापोटी तक्रारकर्त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये आणि तक्रार खर्चापोटी प्रत्येकी एक हजार रुपये द्यावे, असा आदेश देण्यात आला आहे. या प्रकरणात तक्रारकर्त्यांची बाजू अ‍ॅड.कोडापे यांनी मांडली. (वार्ताहर)