शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात काट्याची टक्कर

By admin | Updated: October 11, 2014 23:13 IST

सर्वांचे लक्ष लागून असलेल्या यवतमाळ विधानसभा मतदारसंघात काट्याची टक्कर होत आहे. येथील लढत सर्वाधिक लक्षवेधी राहणार आहे.

यवतमाळ : सर्वांचे लक्ष लागून असलेल्या यवतमाळ विधानसभा मतदारसंघात काट्याची टक्कर होत आहे. येथील लढत सर्वाधिक लक्षवेधी राहणार आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या यवतमाळ विधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात सर्वाधिक तीन लाख ३८ हजार ८१७ मतदार आहेत. त्यात १ लाख ७५ हजार ९२४ पुरुष तर १ लाख ६२ हजार ८९१ महिला मतदारांचा समावेश आहे. या मतदारसंघात दोन तृतीय पंथी मतदारांचीही नोंद झाली आहे. १५ आॅक्टोबर रोजी मतदान होऊ घातले असून प्रत्यक्ष निवडणुकीसाठी आता केवळ चार दिवस उरलेले आहेत. या मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांचे पुत्र राहुल ठाकरे रिंगणात आहे. राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य संदीप बाजोरिया, भाजपाचे माजी आमदार मदन येरावार, शिवसेनेचे संतोष ढवळे, बसपाचे तारीक लोखंडवाला हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. याशिवाय महसूल कर्मचाऱ्यांचे नेते रवींद्र देशमुख, ओबीसी संघाचे प्रदीप वादाफळे, मनसेचे भानुदास राजने, भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे दिलीप मुक्कावार, भारिप बहुजन महासंघाचे अशोक शेंडे, रिपाइंचे सोपान कांबळे, राष्ट्रीय बहुजन काँग्रेस पार्टीचे पुरुषोत्तम भजगवरे आदी २२ उमेदवार निवडणूक लढवित आहे. येथे पंचरंगी लढतीची चिन्हे दिसू लागली आहे. थेट लढत राष्ट्रवादी-भाजपात होते की, काँग्रेस व शिवसेनेत याकडे नजरा लागल्या आहेत. काँग्रेसच्या राहुल ठाकरेंवर बाहेरचा उमेदवार म्हणून ठपका ठेवला जात आहे. बसपाच्या तारीक लोखंडवाला यांच्यामुळे काँग्रेसच्या परंपरागत मुस्लीम आणि दलित मतांमध्ये विभाजन मोठ्या प्रमाणात होणार आहे. कुणबी मतांच्या बळावर विजयाचा दावा करणाऱ्या काँग्रेसला येथेही रवींद्र देशमुख व प्रदीप वादाफळे या उमेदवारांमुळे मत विभाजनाचा सामना करावा लागणार आहे. त्यातच कुणबी समाज एकवटत असल्याच्या केवळ वार्तेनेच अन्य समाज एकत्र येऊन काँग्रेसच्या विरोधात उभा होताना दिसतो आहे. जनतेतील काँग्रेसवर आणि विशेषत: माणिकराव ठाकरेंवर असलेली नाराजी, मतविभाजन बघता राहुल ठाकरे बरेच माघारल्याचे चित्र आहे. काँग्रेसवरील नाराजीमागे महिला आमदार नंदिनी पारवेकरांचे कापलेले तिकीट हे प्रमुख कारण सांगितले जाते. यामुळे यवतमाळ मतदारसंघातील महिलांनी काँग्रेसला धडा शिकविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या उलट स्थिती राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप बाजोरिया यांची आहे. (कार्यालय प्रतिनिधी)