शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांपासून बाभूळगाव येथील बीएसएनएल सेवा ठप्प

By admin | Updated: March 12, 2015 02:24 IST

येथे दूरसंचार विभागाने टोलेजंग कार्यालय उभारले असले तरी आपल्या ग्राहकांना सेवा देण्यास असमर्थ असल्याचे दिसून येत असून ...

बाभूळगाव : येथे दूरसंचार विभागाने टोलेजंग कार्यालय उभारले असले तरी आपल्या ग्राहकांना सेवा देण्यास असमर्थ असल्याचे दिसून येत असून गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यातील दूरध्वनी सेवा ठप्प झाल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.यवतमाळ येथून जमिनीखालून येणारी दूरसंचार विभागाची केबल सरळ बाभूळगावला न पोहोचता यवतमाळ व्हाया कळंब व नंतर बाभूळगाव अशी टाकण्यात आली आहे. त्यामुळे कळंब तालुक्यात कुठेही केबलमध्ये बिघाड आल्यास बाभूळगाव तालुका आपोआप ठप्प पडतो. दूरसंचार विभागाने बाभूळगाव येथे भले मोठे कार्यालय उभारले आहे. मात्र नोकर भरती कपात केल्यामुळे केवळ दोन फोन मॅकेनिक या ठिकाणी सेवा देत आहेत. पैकी दूरसंचार विभागाच्या परिसरात शासकीय निवासस्थानात प्रभाकर अळसपुरे हेच फक्त कायम हजर असतात. येथील शाखा अभियंता घोंगडे यांचेकडे राळेगाव, कळंब, बाभूळगाव या तीन तालुक्यांचा भार असल्याने ते यवतमाळवरूनच तिन्ही तालुक्याचे कामकाज पाहतात. याच विभागाचे एसडीओ शेटे यांचे कायम या तालुक्याकडे दुर्लक्ष असल्याचे निदर्शनास येते. कळंब तालुक्यात मोठ्या प्रमाणावर ले-आऊटची उभारणी केली जात आहे. जेसीबीने नालीचे काम करीत असताना अनेकदा दूरसंचाची केबल तुटून कळंब तालुक्यासह बाभूळगावचीही लॅन्डलाईन सेवा बंद पडते. बाभूळगाव तालुक्यात सरूळ, दाभा, कोटंबा व सावर हे मोठे केंद्र आहेत. बाभूळगाव वरून या केंद्रांना दूरध्वनीसेवा पुरविण्यात आली आहे. मात्र कळंबमध्ये समस्या निर्माण झाली की बाभूळगाव बंद पडते. यवतमाळ येथून निघालेली केबल सरळ बाभूळगावला न टाकता कळंब मार्गे आणण्यात आल्याने ही समस्या वेळोवेळी निर्माण होत आहे. ८ मार्चच्या रात्रीपासून बाभूळगाव तालुक्याची बंद असलेली दूरसंचार विभागाची सेवा बातमी लिहिपर्यंत सुरू झालेली नाही. यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वरिष्ठांकडून अधिक माहिती घेतली असता कळंब येथील दूरसंचार कार्यालयातील बॅटऱ्या निकामी झाल्याचे सांगण्यात आले. यामुळे बाभूळगाव तालुक्यातील दूरसंचार सेवा विस्कळीत झाली. वरिष्ठांनी जातीने लक्ष घालून सेवा पूर्ववत करावी, अशी त्रस्त टेलिफोन ग्राहकांची मागणी आहे. (प्रतिनिधी)